Seemanchal Express : सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 09:43 AM2019-02-03T09:43:19+5:302019-02-03T12:39:52+5:30

Seemanchal Express Accident : बिहारमधील सहदेई बुजुर्ग येथे मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे.  जोगबनी-आनंद विहार टर्मिनल सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.

Seemanchal Express accident : 7 dead as Delhi-bound train derails in Bihar's Vaishali | Seemanchal Express : सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

Seemanchal Express : सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यूरेल्वे दुर्घटनेत अनेक जण जखमीपहाटेच्या सुमारास झाला अपघात, दुर्घटनेमागील कारण अस्पष्ट

पाटणा - बिहारमधील सहदेई बुजुर्ग येथे मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे.  जोगबनी-आनंद विहार टर्मिनल सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे 3.58 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.  ही एक्स्प्रेस जोगबनीहून दिल्लीच्या दिशेनं प्रवास करत होती. या भीषण दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळावर सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.  

एनडीआरएफची टीम आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळाला मोठा तडा गेला आहे. मात्र अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातात जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती गंभीर आहे. 
दुर्घटना घडली त्यावेळेस काळोख असल्याच्या कारणामुळे मदत आणि बचाव कार्य उशिराने सुरू झाले, अशी माहिती समोर आली आहे. 

दुसरीकडे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करत दुर्घटनेबाबतची माहिती दिली. 

मृतांच्या कुटुंबीयांना  4 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा.




 





 




रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी
सोनपूर - 0615822164 
हाजीपीर - 06224272230 
बरौनी- 06279232222 
पाटणा  - 06122202290, 06122202291, 06122202292, 06122213234



 
































Web Title: Seemanchal Express accident : 7 dead as Delhi-bound train derails in Bihar's Vaishali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.