माझ्याआधीच पंतप्रधानांना मिळाली भूकंपाची माहिती - राजनाथ सिंह

By Admin | Published: April 27, 2015 02:15 PM2015-04-27T14:15:16+5:302015-04-27T14:51:43+5:30

नेपाळ व भारतातील भूकंपाची माहिती आपल्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना होती आणि त्यांनी त्यावर तत्काळ बैठक बोलावून मदत पथके पाठवण्याचा निर्णय घेतला, असे आश्चर्यजनक वक्तव्य राजनाथ सिंग यांनी केले.

Seismic information given to PM before me - Rajnath Singh | माझ्याआधीच पंतप्रधानांना मिळाली भूकंपाची माहिती - राजनाथ सिंह

माझ्याआधीच पंतप्रधानांना मिळाली भूकंपाची माहिती - राजनाथ सिंह

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - नेपाळ व भारतातील भूकंपाची माहिती आपल्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना होती आणि त्यांनीच मला त्याबद्दल माहिती देत तत्काळ बैठक बोलावून मदत पथके पाठवण्याचा निर्णय घेतला, असे आश्चर्यजनक वक्तव्य राजनाथ सिंग यांनी केले. गृहमंत्री असूनही देशातील भूकंपाबद्दलची माहिती मला आधी कळली नाही, टीव्ही लावल्यावरच मला त्या घटनेची तीव्रता कळली, अशी कबुली त्यांनी लोकसभेतील निवेदनादरम्यान दिली. शनिवारी दुपारी नेपाळ व भारतात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात आत्तापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला असून लाखो नागरिक बेघर झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार करत असलेल्या मदत व बचावकार्याबद्दलही राजनाथ सिंह यांनी सभागृहात माहिती दिली. 'आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या संकटकाळात भारत खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा असून त्यांना सर्वतोपरी मदत सुरू आहे.  भारत सरकारकडून मदतीसाठी अन्न, औषधं, ब्लॅंकेट्स तसेच मानवरहित विमान पाठवण्यात आल्याचेही त्यांनी  नेपाळमध्ये अडकलेलया २ हजार ५०० नागरिकांना भारतात परत आणम्यास यश मिळाले असून इतरांच्या सुटकेचेही प्रयत्न सुरू आहेत. संकटकाळात भारत सरकार  इतर देशातील नागरिकांनाही आसरा देणार असून त्यांना भारतात येण्यासाठी मोफत व्हिसा देण्यात येणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान नेपाळमधील भूकंपबळींचा आकडा आता  ३ हजार ६१७ वर पोचला आहे, अशी अधिकृत माहिती नेपाळ पोलिसांतर्फे देण्यात आली आहे. 

Web Title: Seismic information given to PM before me - Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.