लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची जप्त लघु सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन : १९ लाख ८३ हजारांची रक्कम थकित
By admin | Published: July 27, 2016 07:17 PM2016-07-27T19:17:23+5:302016-07-27T19:17:23+5:30
जळगाव : पाचोरा तालुक्यातील साजगाव मोहाडी शिवारात लघुसिंचन प्रकल्पाच्या कामासाठी ११ हेक्टर ६८ आर जागेचे भूसंपादन करीत वाढीव मोबदल्याची १९ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम न दिल्यामुळे दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची व संगणक बुधवारी दुपारी १२ वाजता जप्त करण्यात आले.
Next
ज गाव : पाचोरा तालुक्यातील साजगाव मोहाडी शिवारात लघुसिंचन प्रकल्पाच्या कामासाठी ११ हेक्टर ६८ आर जागेचे भूसंपादन करीत वाढीव मोबदल्याची १९ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम न दिल्यामुळे दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची व संगणक बुधवारी दुपारी १२ वाजता जप्त करण्यात आले.पाचोरा तालुक्यातील साजगाव मोहाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी १९९५ मध्ये ३१ शेतकर्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. या संदर्भात शेतकर्यांनी जिल्हा न्यायालयात वाढीव मोबदला मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानुसार २००८ मध्ये अर्ज मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर शासनाने याबाबत उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने २०१० मध्ये शेतकर्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. शासन वाढीव मोबदला देत नसल्याने दिलीप पुंडलिक चौधरी या शेतकर्याने १९ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम मिळावी यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात जप्ती वॉरंटसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने ६ जून रोजी जप्तीचे आदेश काढले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करता यावी यासाठी शेतकर्याने याबाबत कार्यकारी अभियंता यांना सांगितले होते. मात्र त्यानंतरही दखल घेतली गेली नाही.बुधवारी शेतकरी दिलीप चौधरी हे ॲड.अशोक चौधरी यांच्यासह गोलाणी मार्केटमधील लघुसिंचन जलसंधारण विभाग (जि.प.) या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांना न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखविली. तसेच खुर्ची व संगणक जप्त करीत असल्याची माहिती दिली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाईक यांची खुर्ची व संगणक जप्त करण्यात आले.कोटपाचोरा तालुक्यातील साजगाव, मोहाडी येथील लघुसिंचन प्रकल्पासाठी दिलीप चौधरी या शेतकर्याच्या जमिनीचे भूसंपादन केले होते. जिल्हा व उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही शासनाकडून पैसे दिले जात नसल्याने शुक्रवारी कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांची खुर्ची व संगणक जप्त केले आहे.ॲड.अशोक चौधरी, शेतकर्याचे वकील.