चेअरमनपदासाठी तिघे स्पर्धेत शेतकी संघ निवढणूक : विविध पक्षाशी संबंधी एकत्र आल्याने विजय सुकर

By admin | Published: February 8, 2016 10:55 PM2016-02-08T22:55:13+5:302016-02-08T22:55:13+5:30

जळगाव- शेतकी संघाच्या निवडणुकीत विविध पक्षाशी संबंधी मंडळी एकत्र आली. त्यांनी लकी टेलर यांच्याकडे नेतृत्व सोपवित ही निवडणूक लढविली. यामुळे विजय सुकर झाला. यातच आता चेअरमन कोण होईल याकडे लक्ष असून, त्याबाबत सर्वसामान्य शेतकरी पॅनलची आठवडाभरात बैठक होणार असल्याची माहिती या पॅनलचे नेते लकी टेलर यांनी दिली.

Selecting three teams for the chairmanship of the team: Vijay Sukarna after meeting with various parties | चेअरमनपदासाठी तिघे स्पर्धेत शेतकी संघ निवढणूक : विविध पक्षाशी संबंधी एकत्र आल्याने विजय सुकर

चेअरमनपदासाठी तिघे स्पर्धेत शेतकी संघ निवढणूक : विविध पक्षाशी संबंधी एकत्र आल्याने विजय सुकर

Next
गाव- शेतकी संघाच्या निवडणुकीत विविध पक्षाशी संबंधी मंडळी एकत्र आली. त्यांनी लकी टेलर यांच्याकडे नेतृत्व सोपवित ही निवडणूक लढविली. यामुळे विजय सुकर झाला. यातच आता चेअरमन कोण होईल याकडे लक्ष असून, त्याबाबत सर्वसामान्य शेतकरी पॅनलची आठवडाभरात बैठक होणार असल्याची माहिती या पॅनलचे नेते लकी टेलर यांनी दिली.
चेअरमनपदासाठी तिघे इच्छुक आहेत. त्यात जानकाबाई वसंत चौधरी, गोपाळ फकीरचंद पाटील व शालीक नारायण पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

सर्वच उमेदवार नवे
निवडून आलेल्या १५ पैकी रामचंद्र पाटील यांचा अपवाद वगळता इतर कुठल्याही उमेदवाराने किंवा विजेत्याने एकदाही शेतकी संघाचे संचालकपद भूषविलेले नाही. या निवडणुकीत सर्व आजी माजी संचालकांना मतदारांनी नाकारले.

तीन माजी चेअरमन पराभूत
तीन माजी चेअरमन पराभूत झाले आहेत. त्यात सहकार विकास पॅनलचे प्रमुख अर्जुन पाटील, मुरलीधर पाटील व भाऊलाल नामदेव पाटील यांचा समावेश आहे.

टेलर यांच्या पाठीराख्यांची कमाल
लकी टेलर यांनी एकहाती सत्ता मिळविली. पण त्यांना अनिल भोळे, पंकज पाटील, संभा आबा पाटील, मच्िंछद्र तंगा पाटील, प्रशांत पाटील आदींनी व्यूहरचना आखण्यात टेलर यांना मदत केली.

दिग्गज एकत्र
या निवडणुकीत विविध पक्षांशी संबंधित दिग्गज एकत्र आले. त्यात बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी, संचालक प्रभाकर पवार, प्रभाकर सोनवणे, सुधाकर पाटील, कृषिभूषण राजेश पाटील, रमेश पाटील, श्यामकांत जाधव, मुरलीधर मोहन पाटील, भरत प्रतापराव जाधव आदींनी लकी टेलर यांना सहकार्य केले.

पंढीराथ भादू चौधरी, भिलाभाऊंच्या कुटुंबीयांना संधी
बाजार समिती व शेतकी संघाचे माजी चेअरमन राहीलेले डोंगर भादू चौधरी (पंढरी तात्या) यांच्या स्नुषा जानकाबाई चौधरी या निवडणुकीत विजयी झाल्या. चौधरी यांचे पुतणे हर्षल चौधरी हे आव्हाणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन आहे. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भिलाभाऊ सोनवणे यांचे पुतणे दिनेश सोनवणेदेखील निवडून आले आहे. अर्थातच चौधरी व सोनवणे कुटुंबातील आणखी एक सदस्याची तालुक्याच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे.

सर्वसामान्य शेतकरी पॅनल लकी
बाजार समितीच्या निवडणुकीतही लकी टेलर यांनी सर्वसामान्य शेतकरी पॅनलची मोट बांधली होती. या निवडणुकीतही त्यांनी सर्वसामान्य शेतकरी पॅनल गठीत करून आपले उमेदवार रिंगणात उतरविले. त्यांना यश मिळाले. हे पॅनल त्यांच्यासाठी लकी ठरले.

Web Title: Selecting three teams for the chairmanship of the team: Vijay Sukarna after meeting with various parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.