अधिकार वापरताना आत्मसंयम बाळगा
By admin | Published: April 17, 2016 03:26 AM2016-04-17T03:26:38+5:302016-04-17T03:26:38+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील न्यायाधीशांना ‘न्यायिक सक्रियते’ च्या धोक्याबाबत सावध राहण्याचा सल्ला देताना अधिकारांचा वापर करताना सामंजस्य ठेवण्याचे तसेच
भोपाळ : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील न्यायाधीशांना ‘न्यायिक सक्रियते’ च्या धोक्याबाबत सावध राहण्याचा सल्ला देताना अधिकारांचा वापर करताना सामंजस्य ठेवण्याचे तसेच अशा परिस्थितीला सामोरे जाताना आत्मसंयम बाळगण्याचे आवाहन शनिवारी केले.
येथे आयोजित राष्ट्रीय न्यायालयीन अकादमीच्या एका कार्यक्रमाला राष्ट्रपती संबोधित करीत होते.
राज्यघटना सर्वोच्च असल्याचे अधोरेखित करताना राष्ट्रपती म्हणाले की, आमच्या लोकशाहीतील प्रत्येक स्तंभाने आपल्या चौकटीत राहून काम करणे अपेक्षित आहे तसेच दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेपही करु नये. न्यायिक सक्रियतेने अधिकारांचे वाटप कमकुवत करण्याच्या दिशेने पाऊल उचलू नये. कारण अधिकारांचे वाटप संवैधानिक पद्धतीने झाले आहेत.
(वृत्तसंस्था)
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य सर्वांसाठी महत्त्वाचे...
न्यायपालिका व कार्यपालिकेकडून अधिकारांचा वापर हा न्यायालयीन समीक्षेचा विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्थात न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि अखंडता ही केवळ न्यायाधीशांसाठीच नव्हेतर सामान्यांसाठीही महत्त्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
न्यायिक समीक्षा हा पायाभूत संरचनेचा हिस्सा असल्याचे सांगून प्रणव मुखर्जी म्हणाले की, कायदेशीर प्रक्रियेच्या आधारेही यात बदल करणे शक्य नाही. त्यांनी भारतासारख्या विकसनशील देशात न्यायाला बहुआयामी बनविण्यात न्यायपालिकेच्या भूमिकेची प्रशंसा केली.