स्व. जवाहरलाल दर्डा पुरस्काराचे आज वितरण
By admin | Published: September 17, 2016 03:06 AM2016-09-17T03:06:03+5:302016-09-17T03:06:03+5:30
राजस्थानात पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांना पिंक सिटी प्रेस क्लब जयपूर व लोकमत मीडिया प्रा. लि. च्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी
जयपूर : राजस्थानात पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांना पिंक सिटी प्रेस क्लब जयपूर व लोकमत मीडिया प्रा. लि. च्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा स्मृती लोकमत पत्रकारिता पुरस्काराने तसेच अशोक गहलोत लोकमत मित्रता पुरस्काराने गौरवण्यात येते. या दोन पुरस्कारांच्या विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्या हस्ते व राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारियांच्या विशेष उपस्थितीत जयपूरमध्ये शनिवारी सकाळी होणार आहे.
इंद्रलोक सभागृहात हा सोहळा होणार आला असून विख्यात पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक, नवभारत टाइम्सचे माजी संपादक विश्वनाथ सचदेव, इंडियन न्यूजपेपर सोसायटी नवी दिल्लीचे उपाध्यक्ष सोमेश शर्मा, जयपूरच्या इन्टर्नल हार्ट केअर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मंजू शर्मा आदी मान्यवर कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत. राजस्थानात पत्रकारिच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांना १९९९ सालापासून स्व. जवाहरलालजी दर्डा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा सन २0१५-१६ चा पुरस्कार द डेझर्ट रेल च्या संपादिका श्रीमती अमृता मौर्य यांना, तर अशोक गहलोत लोकमत मित्रता पुरस्कार नॅशनल अफेअर्स न्यूज नेटवर्कचे संपादक विजय त्रिवेदी यांना जाहीर झाला आहे.
याखेरीज यंदाच्या सोहळ्यात २0१0-११ पासून २0१४-१५ पर्यंत सलग चार वर्षांच्या दोन्ही पुरस्कार विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
दर्डा पुरस्काराचे मानकरी
२0११-१२ विनोद भारद्वाज (स्वतंत्र पत्रकार), २0१२-१३ श्रीचंद्र मेहता (कार्यकारी संपादक, दैनिक नफा नुकसान) , २0१३-१४, सुरेंद्र जैन पारस (मुक्त छायाचित्रकार) आणि २0१४-१५,श्रीमती राखी जैन (कंटेट हेड ए-1 टीव्ही)
गहलोत पुरस्कार कोणाकोणाला
२0११-१२ चिरंजीव जोशी सरोज (संपादक, पाक्षिक नवयुग),२0१२-१३ पद्म मेहेता (संपादक, जलते दीप), २0१३-१४, प्रकाश भंडारी (विशेष प्रतिनिधी द फ्री प्रेस जर्नल), २0१४-१५, महेशचंद्र शर्मा (नवज्योती.).
या सोहळयासाठी लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा जयपुरात दाखल झाले असून, शुक्रवारी सायंकाळी पिंक सिटी प्रेस क्लबचे पदाधिकारी तसेच पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांशी त्यांनी चर्चा केली.