पान ४ महिला उपनिरीक्षकपदांसाठी अर्ज मागविण्यामागे स्वार्थ

By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:16+5:302015-05-05T01:21:16+5:30

कुडचडे गट काँग्रेस समितीचा आरोप

Self-interest for seeking an application for women's sub-inspectors | पान ४ महिला उपनिरीक्षकपदांसाठी अर्ज मागविण्यामागे स्वार्थ

पान ४ महिला उपनिरीक्षकपदांसाठी अर्ज मागविण्यामागे स्वार्थ

Next
डचडे गट काँग्रेस समितीचा आरोप
मडगाव : पोलीस खात्याने ७९ महिला उपनिरीक्षकांची पदे भरण्यासाठी अर्ज मागविले असून यामागे राजकारण्यांचा वैयक्तिक स्वार्थ दडला आहे, असा आरोप काँग्रेसच्या कुडचडे गट समितीने केला आहे.
यापूर्वी एकदा पोलीस खात्याने महिला उपनिरीक्षकांची पदे जाहीर करून त्यासाठी अर्ज मागविले होते. त्या वेळी घेतलेल्या शारीरिक चाचणीत अयशस्वी ठरलेल्यांनी या नवीन पदांसाठी अर्ज करू नये, असे आवाहन केले असून हे चुकीचे आहे. उमेदवारांना या पदांवर भरती करून वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीच ही नवीन पदे जाहीर केली आहेत, असा आरोप गट अध्यक्ष जॉन डिकॉस्ता यांनी प्रसिध्दी पत्रकांतून केला आहे.
यापूर्वी या पदासाठीच्या उमेदवाराजवळ चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना असायला हवा, अशी अट घातली होती. मात्र, या वेळी ती शिथील केली असून वयोमर्यादाही २८ वरून ३0 वर नेली आहे, हे स्वागतार्ह असल्याचे डिकॉस्ता यांनी म्हटले आहे. गेल्या वेळी चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना ज्यांच्याजवळ नव्हता त्या उमेदवारांना बोलावणे पाठविण्यात येणार असल्याचे खात्याने म्हटले आहे. मग शारीरिक चाचणीत अयशस्वी ठरलेल्यांवरच अन्याय का, असा प्रश्न डिकॉस्ता यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Self-interest for seeking an application for women's sub-inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.