नसबंदी शस्त्रक्रिया मृत्यूप्रकरणाची उच्च न्यायालयाकडून स्वत: दखल

By admin | Published: November 13, 2014 01:59 AM2014-11-13T01:59:55+5:302014-11-13T01:59:55+5:30

शस्त्रक्रियेनंतर 11 महिलांच्या मृत्यूप्रकरणाची माध्यमांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारावर स्वत:हून दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी नकार दिला़

Self-occupation of sterilization surgery by the High Court of Death | नसबंदी शस्त्रक्रिया मृत्यूप्रकरणाची उच्च न्यायालयाकडून स्वत: दखल

नसबंदी शस्त्रक्रिया मृत्यूप्रकरणाची उच्च न्यायालयाकडून स्वत: दखल

Next
नवी दिल्ली/बिलासपूर(छत्तीसगड) : छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्हय़ात नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर 11 महिलांच्या मृत्यूप्रकरणाची माध्यमांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारावर स्वत:हून दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी नकार दिला़ 
याउलट छत्तीसगड उच्च न्यायालयाने मात्र या प्रकरणाची स्वत: दखल घेत, छत्तीगसड राज्य सरकारला दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल़े राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही याप्रकरणी राज्य सरकारकडून दोन आठवडय़ांत अहवाल मागितला आह़े
एका वकिलाने मीडियातील बातम्यांचा हवाला देत, याप्रकरणी न्यायालयीन हस्तक्षेपाची विनंती सर्वोच्च न्यायालयास केली होती़ मात्र सरन्यायाधीश एच़एल़ दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला़ मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमक्ष हे प्रकरण उपस्थित केले आह़े              
न्यायालय यात स्वत:हून दखल देऊ शकत नाही़ मीडियातील बातम्यांपेक्षा आपण एक याचिका दाखल करायला हवी होती, असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केल़े 
छत्तीसगड उच्च न्यायालयाने मात्र या प्रकरणाची मीडियातील वृत्ताच्या आधारे स्वत:हून गंभीर दखल घेत, राज्य सरकारला धारेवर धरल़े याप्रकरणी 1क् दिवसांत सखोल अहवाल सादर करा आणि उपचार घेत असलेल्या पीडित महिलांना सवरेत्कृष्ट आरेाग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी दिल़े
बिलासपूर जिल्हय़ात एका खासगी रुग्णालयात राज्य सरकारतर्फे आयोजित कुटुंब नियोजन शिबिरात नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यानंतर 11 महिलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता़ अद्यापही 49 महिलांची प्रकृती गंभीर आह़े  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
‘एम्स’चे डॉक्टर पोहोचले, उपचार सुरू
बिलासपूर :  नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर 11 महिलांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीस्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) सात डॉक्टरांचा एक चमू बुधवारी बिलासपूरला पोहोचला़ नसबंदी शस्त्रक्रियेनंतर अद्यापही 49 महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हय़ातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत़
या दरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी पीडित महिलांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी आपल्या निवासी कार्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली़ यादरम्यान त्यांनी एम्स चमूच्या प्रमुखांशी दूरध्वनीवरून चर्चा केली़
 एम्सच्या अॅनेस्थेशिया विभागाचे प्रोफेसर डॉ़ अंजन त्रिखा यांनी सांगितले की,पीडित महिलांवर योग्य उपचार सुरू आहेत़ 11 महिलांच्या मृत्यूमागचे कारण काय? असे विचारले असताना, तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत ठोस काही सांगता येईल, असे ते म्हणाल़े (वृत्तसंस्था)

 

Web Title: Self-occupation of sterilization surgery by the High Court of Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.