तरुणांच्या ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना

By admin | Published: February 1, 2017 11:58 AM2017-02-01T11:58:21+5:302017-02-01T12:08:19+5:30

अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ऑनलाईन शिक्षणासहीत रोजगार प्रशिक्षणावरही भर देण्यात आले आहे.

'Self-plan' to give youth education online | तरुणांच्या ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना

तरुणांच्या ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1 - अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ऑनलाईन शिक्षणासहीत रोजगार प्रशिक्षणावरही भर देण्यात आले आहे.  2022 पर्यंत 5 लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना आणण्यात आली आहे. तर संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटीची तरतूद करण्यात आली असून याद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.  
 
तसंच IIT, मेडिकलसह सर्व उच्चशैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी 'राष्ट्रीय परीक्षा बोर्ड' स्थापन करणार असल्याचे जेटली म्हणालेत. शिवाय देशाबाहेर रोजगाराच्या संधी शोधणा-या युवकांसाठी देशभरात कौशल्य केंद्र स्थापन करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. 

Web Title: 'Self-plan' to give youth education online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.