नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले

By admin | Published: July 14, 2017 08:44 AM2017-07-14T08:44:48+5:302017-07-14T08:52:29+5:30

गोरक्षणाच्या मुद्यावरुन देशातील काही ठिकाणी हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत आहेत. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.

The self-proclaimed Gorodaksha is like a cannibalist: Ramdas Athavale | नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले

नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 14 - गोरक्षणाच्या मुद्यावरुन देशातील काही ठिकाणी हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत आहेत. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. देशातील काही भागांमध्ये कथित गोरक्षणावरुन होणा-या हिंसेवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितले की, कायदा हातात घेणा-या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत की,  स्वयंघोषित गोरक्षक हे खरंतर नरभक्षकप्रमाणे आहेत.  
 
अहमदाबादमध्ये अनेक राज्यांतील सामाजिक कल्याण विभागाची प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात हे दोन्ही मंत्री बोलत होते. यावेळी गुजरात, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दमन दीव आणि दादरा तसंच हवेलीतीलही सामाजिक कल्याण मंत्रीदेखील उपस्थित होते. 
 
गोरक्षणाच्या नावावर अल्पसंख्यांक व दलितांवर होणा-या हल्ल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर गहलोत यांनी सांगितले की, पार्टी व सरकारचं असे स्पष्ट मत आहे की कायदा हातात घेणा-या कोणत्याही व्यक्तीची सुटका करण्यात येणार नाही.  गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणा-या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. 
 
आणखी बातम्या वाचा
(गोरक्षा हा फक्त धार्मिक मुद्दा नाही)
(गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तोडफोड!)
(डॉक्युमेंट्रीमधील गुजरात, गाय शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने घेतला आक्षेप)
 
गुजरातमधील ऊना येथे कथित गोरक्षण नावाच्या दलित तरुणांना करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणावर बोलताना गहलोत म्हणाले की, गुजरात सरकारनं या प्रकरणात गतीनं काम केलं व पीडितांना न्याय मिळवून दिला. तर आठवले म्हणाले की, भाजपा सरकारसहीत देशभरातील अन्य सरकार गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणा-या लोकांविरोधात कारवाई करत आहेत. ही लोकं गोरक्षक नाहीत, तर नरभक्षक आहेत.  पूर्वीदेखील दलितांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी आंतरजातीय विवाह पद्धतीबाबत जनजागृती केली पाहिजे. आमचे मंत्रालयदेखील आंतरराजीत विवाह पद्धतीसंदर्भात जनजागृती करत आहे.
 
दरम्यान, गायींची कत्तल करणाऱ्यांना आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारा कडक कायदा गुजरात सरकारने केला. गाय आमची माता आहे. दूध उत्पादनात गुजरात देशात सर्वात मोठा करण्याचा प्रयत्न. देशी गायींचे संवर्धन व्हावे, चांगल्या वाणाचे गोधन तयार व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात नंदीग्राम उभारण्यात येणार आहे, असे विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केले होते.  
 

Web Title: The self-proclaimed Gorodaksha is like a cannibalist: Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.