‘स्वत:ला विकण्याची’ जाहिरात

By admin | Published: March 3, 2016 03:43 AM2016-03-03T03:43:19+5:302016-03-03T03:43:19+5:30

एखाद्या नामवंत कंपनीमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते आणि त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो; परंतु आयआयटी खडगपूरच्या एका विद्यार्थ्याने

'Sell Yourself' Advertising | ‘स्वत:ला विकण्याची’ जाहिरात

‘स्वत:ला विकण्याची’ जाहिरात

Next

नवी दिल्ली : एखाद्या नामवंत कंपनीमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते आणि त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो; परंतु आयआयटी खडगपूरच्या एका विद्यार्थ्याने फ्लिपकार्ट या भारतीय ई-कॉमर्स वेबसाईटवर नोकरी मिळावी म्हणून स्वत:लाच विकण्याची जाहिरात दिलेली आहे.
आयआयटी पदवीधर असलेला आकाश नीरज मित्तल याने नोकरी मिळविण्यासाठी अशीच एक नवी शक्कल लढविली आहे.
प्रोडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी हवी आहे, असे सांगत आकाशने स्वत:चा रिझ्युमदेखील दिलेला आहे. ‘माझा वरिष्ठ असलेल्या आकाशने फ्लिपकार्टवर स्वत:ला विकण्याची जाहिरात देऊन सर्वांना चकित केले आहे. शब्दश: त्याने स्वत:ला विकायला काढले आहे,’ असे हर्ष बजाज या आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्याने सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'Sell Yourself' Advertising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.