अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:23 IST2025-01-17T05:23:04+5:302025-01-17T05:23:04+5:30
Nitin Gadkari : सीआयआयच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी
नवी दिल्ली : खराब रस्त्यामुळे देशात अनेक ठिकाणी बळी जात आहे. खराब रस्ते बांधल्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात यावा. अपघातांसाठी रस्ते कंत्राटदार व अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांना तुरुंगात पाठवावे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी म्हटले आहे.
सीआयआयच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. खराब रस्ते बांधकाम हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात यावा आणि अपघातांसाठी रस्ते कंत्राटदार आणि अभियंते यांना जबाबदार धरून तुरुंगात पाठवले जावे.