Send Off: विद्यार्थींनींनी भरल्या डोळ्यांनी गाणे म्हटले, निरोपावेळी मॅडमचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:03 PM2022-02-21T17:03:10+5:302022-02-21T17:07:46+5:30

Send Off: ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत शिक्षक आणि विद्यार्थीनींच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पाहायला मिळत आहे.

Send Off: Madame's eyes watered during the message, the students sang with tears in their eyes in siliguri highschool | Send Off: विद्यार्थींनींनी भरल्या डोळ्यांनी गाणे म्हटले, निरोपावेळी मॅडमचे डोळे पाणावले

Send Off: विद्यार्थींनींनी भरल्या डोळ्यांनी गाणे म्हटले, निरोपावेळी मॅडमचे डोळे पाणावले

Next

कोलकाता - शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातंच वेगळं असतं. शाळेत, कॉलेजमध्ये अनेक शिक्षकांसमेवत विद्यार्थ्यांचं प्रेमाचं, मैत्रिचं नातं तयार होतं. मात्र, कधी विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झाल्याने त्यांना शाळा किंवा कॉलेज सोडावं लागतं. तर, कधी शिक्षकांची बदली झाल्यामुळे, निवृत्ती झाल्याने त्यांनाही शाळा वा कॉलेज सोडून निरोप द्यावा लागला. विद्यार्थी आणि शिक्षकांमधील निरोपाचा हा क्षण अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावतो. सध्या, अशाच एका निरोप समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत शिक्षक आणि विद्यार्थीनींच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या शिक्षिकेस दोन विद्यार्थींनी हाताला धरुन बागेत घेऊन येतात, या बागेत अनेक विद्यार्थीनी गोलाकार घोळका करुन गुडघ्यावर बसलेल्या दिसतात. या विद्यार्थींनीच्या हातात गुलाबाचे फूल असते, आणि ओठांवर गाणे... तुझमे रब दिखता है.... हा क्षणिक भावूक प्रसंग अनेकांचे मन हेलावून जातो. भरल्या डोळ्यांनीच विद्यार्थींनी आपल्या लाडक्या शिक्षिकेची गळाभेट घेतात. 


पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यातील बीकेएपी गर्ल्स हायस्कूलमधील हा व्हिडिओ आहे. या शिक्षिकेचं नाव संपा असून आय लव्ह सिलीगुरी या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  
 

Web Title: Send Off: Madame's eyes watered during the message, the students sang with tears in their eyes in siliguri highschool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.