सहा महिन्यांच्या मुलीला तुरुंगात पाठवा, कुटुंबीयच करताहेत मागणी, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 04:07 PM2022-10-04T16:07:37+5:302022-10-04T16:10:29+5:30
Uttar Pradesh News: आतापर्यंत तुम्ही तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी अधिकारी आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे तुम्ही ऐकले होते. मात्र चित्रकूटमध्ये एका मुलीचे कुटुंबीय तिला तुरुंगात पाठवण्यासाठी अधिकाऱ्यांना अर्ज विनंत्या करत आहेत
चित्रकुट - आतापर्यंत तुम्ही तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी अधिकारी आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे तुम्ही ऐकले होते. मात्र चित्रकूटमध्ये एका मुलीचे कुटुंबीय तिला तुरुंगात पाठवण्यासाठी अधिकाऱ्यांना अर्ज विनंत्या करत आहेत. चित्रकुट जिल्ह्यामध्ये या सहा महिन्याच्या मुलीला तुरुंगात पाठवण्यासाठी तिच्या कुटुंबातील सदस्यांवर अधिकाऱ्यांचे उबंरठे झिजवण्याची वेळ आलेली आहे.
चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर पोलीस ठाणे क्षेत्रातील रामलीला पाहत असताना एका तरुणीसोबत पोलिसांनी गैरवर्तन केले होते. त्यानंतर जमावाने दोन शिपाय पोलीस शिपायांना मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी २० ज्ञात आणि ५० अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये पूजा नावाच्या एका विवाहित महिलेचाही समावेश होता. तिची एक सहा महिन्यांची मुलगी आहे. पोलिसांनी या महिलेलाही मारहाणीप्रकरणी तुरुंगात पाठवले आहे. तर तिच्या सहा महिन्यांच्या चिमुरडीला नातेवाईकांकडे सोडले आहे.
आई तुरुंगात गेल्याने या छोट्या मुलीची देखभाल करणारं घरी कुणी नाही. या मुलीला आईचं दूध मिळत नसल्याने तिची अबाळ होत आहे. तसेच ती आईच्या आठवणीने दिवसभर रडत असते. तिला वाचवण्यासाठी तिची आजी तिला तुरुंगात पाठवण्याची परवानगी मिळवण्यासाठी तिची आजी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवत होते. मात्र तिची विनंती कुणीही ऐकून घेत नाही आहे.
दरम्यान, आज या मुलीचे कुटुंबीय तिला घेऊन जिल्हा कारागृहात आले होते. तिथे त्यांनी या मुलीला आईची भेट मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र तुरुंग प्रशासनाने कोर्टाच्या परवानगीशिवाय या मुलीला कोर्टाच्या परवानगीशिवाय आईकडे देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे या मुलीचे नातेवाईक चिंतीत आहे. तर या सहा महिन्यांच्या मुलीला तुरुंगात जावं लागेल का हा प्रश्न पडला आहे.
या प्रकरणी तुरुंगाधिकारी अशोक सागर यांनी सांगितले की, पोलिसांनी कागदपत्रांमध्ये मुलीबाबत माहिती दिलेली नाही आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासन तिला तुरुंगात ठेवू शकत नाही. जोपर्यंत न्यायालय आदेश देत नाही, तोपर्यंत तिला आईकडे सोपवता येणार नाही. जर कोर्टातून आदेश मिळाले तर मुलीला तिच्या आईसोबत ठेवता येईल.