बातमीसाठी पाकीट पाठवितो
By admin | Published: February 1, 2016 12:03 AM2016-02-01T00:03:55+5:302016-02-01T00:03:55+5:30
जळगाव : सामाजिक, राजकीय काम करीत असताना आमचीही बातमी व छायाचित्र वृत्तपत्रात छापुन येतात, तेही मोठ मोठे छापुन येतात, मात्र बर्याच वेळा कार्याची दखल घेतली जात नसल्याने बातमी येण्यासाठी पाकीटे पाठवितो, असे धक्कादायक विधान महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मासिक लेवाशक्ती प्रकाशन सोहळ्यात केले.
Next
ज गाव : सामाजिक, राजकीय काम करीत असताना आमचीही बातमी व छायाचित्र वृत्तपत्रात छापुन येतात, तेही मोठ मोठे छापुन येतात, मात्र बर्याच वेळा कार्याची दखल घेतली जात नसल्याने बातमी येण्यासाठी पाकीटे पाठवितो, असे धक्कादायक विधान महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मासिक लेवाशक्ती प्रकाशन सोहळ्यात केले. औद्योगिक वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्यात ते बोलत होेते. ते पुढे म्हणाले की समाजातील यशस्वी बांधवांचा कार्याचा गौरव व्हायला हवा, आमचाही क ार्याचा विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून होत असतो, छायाचित्र छापून येत असतात, मात्र काही वेळा छापले जात नाहीत, त्यासाठी पाकीटे पाठवितो, बातमीचे.....असे विधान केले. तसेच लेवा पाटील समाजाने प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. मात्र समाजाचा सन्मान होताना दिसत नाही. कारण समाज विखुरला गेला असून त्यात दुरावा देखील निर्माण झाला आहे. यशस्वी झालेल्या आपल्या या समाज बांधवांचा गौरव आपणच करायला हवा, यासाठी समाजातील दुरावा दुर करण्यासाठी एकत्र या, असे आवाहनही त्यांनी कार्यक्रमाद्वारे केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष लेवा पाटील समाजाचे कुटुंब प्रमुख रमेश विठोबा पाटील होते. तर व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, पद्मश्री शितल महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार गुरूमुख जगवानी, माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ. अर्जुन भंगाळे, माजी महापौर विष्णु भंगाळे, उद्योजक गौरव अत्तरदे, नरेंद्र भर्हाटे, मिलिंद चौधरी, उपमहापौर सुनिल महाजन, कुंदन ढाके, शेेखर पाटील आदी उपस्थित होते. इन्फो -जळगावात आय.टी.पार्क उभारण्याचा मानसखासदार असल्याने खेड्या पाड्यात फिरावे लागते, मात्र फिरताना घरातील कर्ते तरुण कामानिमित्त मुंबई, पुणे येथे गेले असल्याने घरात फक्त वृद्ध आई वडीलच दिसले. जेव्हा उतारवयात त्यांना मुलांची गरज आहे, तेव्हाच मुले सोडून गेल्याचे हे चित्र कुठेतरी बदलायला हवे, त्यासाठी सरकारच्या मदतीने जळगावात आय.टी.पार्क उभारण्याचा मानस आहे. जेणेकरून तरुणांना नोकरी स्थानिक ठिकाणीच मिळेल आणि आई वडीलांना उतारवयात सहारादेखील मिळेल. यासाठी मात्र जिल्ातील सर्व नेत्यांनी एकत्र यायला हवे. -रक्षा खडसे, खासदार