ज्येष्ठ नागरिक काढणार मोर्चा

By admin | Published: April 5, 2016 12:15 AM2016-04-05T00:15:51+5:302016-04-05T00:15:51+5:30

जळगाव- ज्येष्ठ नागरिक धोरण मंजूर व्हावे यासाठी विविध ज्येष्ठ नागरिक संघटना ७ रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. फेस्कॉम, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती, ज्येष्ठ नागरिक संघ आदी संघटना या मोर्चामध्ये सहभागी होतील, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे डॉ.व्ही.आर.पाटील यांनी दिली.

The Senior Army's Removal Front | ज्येष्ठ नागरिक काढणार मोर्चा

ज्येष्ठ नागरिक काढणार मोर्चा

Next
गाव- ज्येष्ठ नागरिक धोरण मंजूर व्हावे यासाठी विविध ज्येष्ठ नागरिक संघटना ७ रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. फेस्कॉम, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती, ज्येष्ठ नागरिक संघ आदी संघटना या मोर्चामध्ये सहभागी होतील, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे डॉ.व्ही.आर.पाटील यांनी दिली.
डॉ.पाटील म्हणाले, १९९९ मध्ये केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांचे धोरण मंजूर केले होते. परंतु अद्याप केंद्र व राज्य शासनाने त्याबाबत आर्थिक तरतूद केली नाही. मागील हिवाळी अधिवेशनात समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी काही मागण्या मंजूर करू, असे लक्षवेधी सूचनेसंबंधी आश्वासन दिले होते. ३१ मार्च रोजीही विधान परिषदेत बडोले यांनी आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात मागण्या मंजूर केल्या नाहीत.
या प्रलंबित मागण्यांसाठी आता ७ रोजी मुख्यमंत्री, रेल्वे मंत्री, अर्थमंत्री, जिल्हा प्रशासन यांना निवेदन दिले जाईल. या मोर्चरचे नियोजन जगतराव पाटील, द.तु.चौधरी, आशा तळेले, के.के.भोळे, पी.आर.सोनार, जी.जी.चौधरी, मुकुंद ढाके आदी करीत आहेत.

Web Title: The Senior Army's Removal Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.