भाजपाचे ज्येष्ठ आमदार अरविंद गिरी यांचं निधन, कारमधून मिटिंगला जात असताना आला हृदयविकाराचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 10:17 AM2022-09-06T10:17:18+5:302022-09-06T10:23:02+5:30

BJP MLA Arvind Giri : उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार अरविंद गिरी यांचं आकस्मिक निधन झालं आहे. लखनौ येथे एका बैठकीसाठी जात असताना त्यांना वाटेतच कारमध्ये हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांचं निधन झालं.

Senior BJP MLA Arvind Giri passed away, he suffered a heart attack while going to a meeting in a car | भाजपाचे ज्येष्ठ आमदार अरविंद गिरी यांचं निधन, कारमधून मिटिंगला जात असताना आला हृदयविकाराचा धक्का

भाजपाचे ज्येष्ठ आमदार अरविंद गिरी यांचं निधन, कारमधून मिटिंगला जात असताना आला हृदयविकाराचा धक्का

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेशमधीलभाजपाचे आमदार अरविंद गिरी यांचं आकस्मिक निधन झालं आहे. लखनौ येथे एका बैठकीसाठी जात असताना त्यांना वाटेतच कारमध्ये हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांचं निधन झालं.

अरविंद गिरी हे उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील गोला विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले होते. ते लखनौ येथे एका बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात होते. मात्र कारमधून जात असताना वाटेतच सिधौली येथे त्यांना धावत्या गाडीमध्ये हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लखीमपूर खीरी जिल्ह्यातील गोला विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार अरविंद गिरी यांचं निधन गे अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबाप्रति मी संवेदना व्यक्त करतो. प्रभू श्रीराम दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान आणि शोकाकुल कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, ही प्रार्थना, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

 

Web Title: Senior BJP MLA Arvind Giri passed away, he suffered a heart attack while going to a meeting in a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.