ज्येष्ठांना रेल्वे भाड्यात सूट मिळणार नाहीच; रेल्वेला तोटा नको, सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:19 AM2022-07-21T08:19:34+5:302022-07-21T08:20:12+5:30
ही सवलत आता पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाची साथ आता कमी झाली आहे. मात्र, कोरोनाच्या काळात दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यातील सवलत बंद करण्यात आली होती. ही सवलत आता पुन्हा सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.
सरकारचे म्हणणे आहे की, बहुतांश श्रेणीतील रेल्वे भाडे आधीच कमी आहे. सर्व प्रवाशांसाठी प्रवास खर्चाचा ५० टक्के भार रेल्वे पूर्वीपासून घेत आहे. कोरोनामुळे २०२० - २१ मध्ये खूप कमी प्रवाशांनी प्रवास केला. २०१९-२० च्या दरम्यान सरकारच्या आवाहनानंतर २२.६२ लाख ज्येष्ठ नागरिकांनी सवलत योजना स्वत: हून सोडून दिली.
सरकारने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना सवलतीचे नियम पूर्वीसारखेच असतील. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू यांना भाड्यात पुन्हा सूट देण्यात येणार नाही.
ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी चहा, कॉफी स्वस्त!
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजधानी, दुरांतो, शताब्दी आणि वंदे भारत या गाड्यांमधून रेल्वेने चहा-कॉफीवरील सेवा शुल्क हटवले आहे. चहा, कॉफी व पाणी ऑर्डर करण्यासाठी सेवा शुल्क द्यावे लागणार नाही. जेवण मागवण्यासाठी सेवा शुल्क लागेल.
सवलतीमुळे ५००० कोटींचा फटका
२०१७-१८ च्या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे रेल्वेला १,४९१ कोटींचा तोटा झाला. हा तोटा पुढील वर्षी वाढून १,६३६ कोटी झाला आणि २०१९-२० मध्ये १,६६७ कोटी झाला. - अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री