काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती चिंताजनक, मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू

By बाळकृष्ण परब | Published: November 15, 2020 05:23 PM2020-11-15T17:23:12+5:302020-11-15T17:23:42+5:30

Ahmed Patel News : १ ऑक्टोबर रोजी अहमद पटेल यांनी ट्विक करून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांनी संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभाग घेतला होता.

Senior Congress leader Ahmed Patel's condition is critical and he is undergoing treatment at the intensive care unit of Medanta Hospital | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती चिंताजनक, मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती चिंताजनक, मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अहमद पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वत:च ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती.

१ ऑक्टोबर रोजी अहमद पटेल यांनी ट्विक करून कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांनी संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभाग घेतला होता.



राज्यसभेचे खासदार असलेल्या अहमद पटेल यांनी तेव्हा सांगितले होते की, तपासामध्ये मला कोविड -१९ चा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कामध्ये आलेल्या लोकांनी स्वत:ला क्वारेंटाईन करावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

 

Web Title: Senior Congress leader Ahmed Patel's condition is critical and he is undergoing treatment at the intensive care unit of Medanta Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.