ज्येष्ठ पत्रकार नबीन सिन्हा यांचे दिल्लीत निधन
By admin | Published: March 10, 2017 12:34 AM2017-03-10T00:34:01+5:302017-03-10T00:34:01+5:30
ज्येष्ठ पत्रकार नबीन सिन्हा (६०) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.
नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार नबीन सिन्हा (६०) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.
सिन्हा यांचे शालेय शिक्षण मारवाडी शाळेत झाले. त्यांनी एमए आणि एलएलबी शिक्षण घेतले. सामाजिक उपक्रमांशी घनिष्ट संबंध असल्यामुळे ते पत्रकारितेकडे वळले. रांचीतील इंग्रजी दैनिकात सिन्हा यांनी बातमीदारी सुरू केली. नंतर ते दिल्लीत आले. प्रदीर्घ काळ ते टाईम्स आॅफ इंडिया, आॅब्जर्व्हरमध्ये सक्रिय होते. त्यांनी एस वन आणि आझाद न्यूज चॅनेल सुरू करण्यात महत्वाची भूमिका बजावली. गेल्या चार वर्षांपासून ते ‘लोकमत’च्या दिल्ली ब्युरोमध्ये कार्यरत होते. सिन्हा यांची ओळख त्यांचे सहकारी आणि मित्रांत उत्साही, आनंदी व मदत करण्यास नेहमी तयार असणारे म्हणून होती.