CoronaVirus: “सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:59 AM2021-05-11T10:59:19+5:302021-05-11T11:02:49+5:30

CoronaVirus: रवीश कुमार (Ravish Kumar) यांनीही पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे.

senior journalist ravish kumar criticises pm modi over corona situation in country | CoronaVirus: “सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका

CoronaVirus: “सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान मोदींवर टीकास्त्रसरकार इतकं निर्दयी कसं असू शकतंसोशल पोस्ट व्हायरल

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांनीही पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली असून, कोणतेही सरकार इतके निर्दयी कसे असू शकते, अशी विचारणा केली आहे. (senior journalist ravish kumar criticises pm modi over corona situation in country) 

रवीश कुमार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये देशातील कोरोनाची बिकट परिस्थिती, वाढती बेरोजगारी यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या सलग दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर रवीश कुमार यांची पोस्ट व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे. 

“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताज्या अहवालानुसार, केवळ एप्रिल महिन्यात ३४ लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या ३४ लाख लोकांवर काय वेळ आली असेल, हे आम्हांला माहिती नाही. नोकरी गेलेल्यांच्या घरी आजारी व्यक्ती असेल, तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल, अशातच उपचारांचा खर्च करण्याबाबत त्यांचा आत्मविश्वास ढासळला असेल. कारण अशा परिस्थितीत कोणीही मदत करत नाही आणि बँकेकडूनही सूट मिळत नाही. नागरिकांना आता काहीच नकोय, असे सरकारने मान्य केले आहे का? कोणतेही सरकार इतके निर्दयी कसे असू शकते? हे अतिशय खेदजनक आहे. छोट्या व्यवसायिकांपुढे तर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिलमध्ये ७३ लाख नोकऱ्या गेल्या आहेत, असे रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

लसीकरण धोरणात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करू नये; केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३,२९,९४२ नवे रुग्ण आढळून आले असून, ३,८७६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३७,१५,२२१ रुग्णांवर उपचार सुरू असून, गेल्या २४ तासांत ३,५६,०८२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत १७ कोटी २७ लाख १० हजार ०६६ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.
 

Web Title: senior journalist ravish kumar criticises pm modi over corona situation in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.