निवडणुकीच्या आखाड्यातून भाजपचे वरिष्ठ नेते स्वत:हून बाहेर पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:44 AM2019-04-12T04:44:05+5:302019-04-12T04:44:22+5:30
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संवाद : आमच्या पक्षात घराणेशाही अजिबात नाही
हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जनतेला पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच हवे आहेत, असे सांगतानाच, ईशान्य व दक्षिणेत भाजपच्या जागा वाढतील, असा दावा मनुष्यबळ विकासमंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत केला. त्यांच्याशी झालेला हा संवाद.
च्एनडीएला बहुमत न मिळाल्यास पंतप्रधान कोण होईल?
उत्तर : भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील. देशाला पुन्हा मोदीच पंतप्रधान म्हणून हवे आहेत.
च्सरकार कसे येणार? कोणत्या राज्यात जागा वाढतील? महाराष्ट्रात तर ४८ पैकी ४२ जागा आहेत.
उत्तर : महाराष्ट्रात ४५ जागा येतील. ईशान्येत पूर्वी २५ पैकी ९ जागा मिळाल्या होत्या. आता २२-२३ जागा येतील. ओडिशात पूर्वी एक जागा होती. आता १५- १६ येतील.
च्आपण स्वप्ने तर पाहत नाही?
उत्तर : हे स्वप्न नाहीय. पश्चिम बंगालमध्ये जागा १२-२२ पर्यंत जागा वाढू शकतात. उर्वरित ठिकाणी आमच्या जागा कमी होणार नाहीत. आमच्याकडे सर्व्हे आहे, माहिती आहे.
च्काही ठिकाणी जागा कमी होतील?
उत्तर : आमच्या जागा तामिळनाडूत वाढतील. केरळात खाते उघडेल. अन्य राज्यांतही जागा वाढतील. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात सत्तेतून बाहेर झालो आहोत. पण, लोकसभेच्या जागा फार कमी होणार नाहीत.
च्उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विरोधी पक्ष एकत्र आहेत?
उत्तर : कुठे झाली आहे एकी? त्यांनी काँग्रेसला साथ दिली नाही. काँग्रेसला दोन जागा दिल्या आहेत आणि सांगितले आहे की, त्यांची क्षमता इतकीच आहे.
च्बऱ्याच ठिकाणी विरोधकांची आघाडी आहे.
उत्तर : काँग्रेसची आघाडी ना पश्चिम बंगालमध्ये झाली, ना आंध्रात. बसप छत्तीसगड, हरियाणा, पंजाबमध्ये बसप लढत आहे. आपही स्वतंत्र लढत आहे. कुठे आहे आघाडी?
च्आपण काँग्रेसच्या वक्तव्यांवर अधिक रिअॅक्ट करीत आहात.
उत्तर : खोटे बोलणे हा काँग्रेसचा एकमेव आधार आहे. त्याला उत्तर द्यायलाच हवं. देशात ५५ वर्षे त्यांचेच सरकार होते. गरिबी का कायम राहिली? त्यावेळी इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, गरिबांसाठी बँकांचे दरवाजे खुले करू. मात्र, २०१४ पर्यंत ३५ कोटी लोकांची खाती का नाही उघडली? आम्ही ३४ महिन्यांत हे करून दाखविले.
च्जमावाकडून हत्येच्या मुद्याने विरोधकांना एकत्र आणले. एका वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा आरोप आहे.
उत्तर : अशा घटना घडता कामा नयेत. अगदी एखाद-दुसरी घटनाही व्हायला नको, अशीच आमची भूमिका आहे. आम्ही त्या घटनेचा निषेध करतो.
च्तुम्ही जवळपास सगळ्या विद्यमान खासदारांच्या मुलांना तिकिटे दिली आहेत. बिहारमध्ये हुकूमदेव नारायण यांच्या मुलालाही तिकीट दिले.
उत्तर : घराणेशाहीच्या दोन बाजू आहेत. आम्ही काँग्रेसला जेव्हा घराणेशाहीबद्दल दोष देतो किंवा घराणेशाहीची चर्चा करतो तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की, कार्यक्षमता असलेल्या नेत्यांच्या मुला-मुलींना राजकारणात यायची बंदी असावी. परंतु हे निश्चित आहे की, पक्षाचा अध्यक्ष एकाच कुटुंबातील असणार नाही. पंतप्रधानांचे नियंत्रण अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे एकाच कुटुंबाच्या हाती असणार नाही. सगळा पक्ष एकाच कुटुंबाचा असणार नाही.
च्भाजपने ज्येष्ठांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे...?
उत्तर : हा धोरणात्मक निर्णय आहे. राजकारणात सक्रिय राहण्याचे वय नसते. परंतु ठराविक वेळेनंतर निवडणुकीच्या आखाड्यातून बाहेर व्हायला हवे. आमच्याकडे नानाजी देशमुख १९७७ मध्ये ६० वर्षे झाल्यानंतर राजकारणातून स्वत: राजीनामा देऊन बाहेर पडले. कलराज मिश्रा, कोशियारी, बी. सी. खंडुरी, हुकूमदेव नारायण यादव, करिया मुंडा या सगळ्यांनी स्वत: म्हटले की, आम्ही निवडणूक लढणार नाही.