‘पीएनबी’ घोटाळ्यात ज्येष्ठ अधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 03:12 IST2020-08-13T03:11:28+5:302020-08-13T03:12:00+5:30
कर्जघोटाळा बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत आॅगस्ट २००९ ते मे २०११ या काळात झाला होता. तेव्हा जिंदाल त्या शाखेचे मुख्य व्यवस्थापक होते.

‘पीएनबी’ घोटाळ्यात ज्येष्ठ अधिकारी अटकेत
नवी दिल्ली : नीरव मोदी आणि मेहुल चौकसी या हिरे व्यापारातील मामा-भाच्याच्या जोडीशी संबंधित कंपन्यांना अनियमित पद्धतीने दिलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडित गेल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बुधवारी पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँकेतील राजेश जिंदाल या महाव्यवस्थापक हुद्यावरील अधिकाऱ्यास अटक केली. या प्रकरणातील ही सहावी अटक असून, त्यापैकी जिंदाल हे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.
हा कर्जघोटाळा बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत आॅगस्ट २००९ ते मे २०११ या काळात झाला होता. तेव्हा जिंदाल त्या शाखेचे मुख्य व्यवस्थापक होते. त्यानंतर त्यांना महाव्यवस्थापकपदी बढती मिळून सध्या ते बँकेच्या दिल्लीतील मुख्यालयात कर्ज विभागात होते. दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
बनावट ‘लेटर्स आॅफ अंडरटेकिंग’च्या आधारे हा घोटाळा करण्यात आला होता. या बनावट दस्तावेजांच्या आधारे नंतर विदेशातील बँकांकडून कर्जे घेण्यात आली होती. स्वत: भारतातून फरार झाला आहे.
नीरव मोदी व मेहुल चौकशी यांच्या कंपन्यांमधील पाच अधिकाºयांनाही मंगळवारी अटक केल्याचे ‘सीबीआय’कडून सांगण्यात आले; पण त्याचा तपशील लगेच समजला नाही.