ज्येष्ठ चित्रकार एस.एच. रझा कालवश

By Admin | Published: July 23, 2016 02:12 PM2016-07-23T14:12:22+5:302016-07-23T16:43:28+5:30

आंतररराष्ट्रीय ख्यातीचे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, आधुनिक भारतीय कलाकार एस.एच. रझा यांचे दीर्घ आजाराने शनिवारी दिल्लीत निधन झाले.

Senior painter S.H. Raza Kalwash | ज्येष्ठ चित्रकार एस.एच. रझा कालवश

ज्येष्ठ चित्रकार एस.एच. रझा कालवश

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - आंतररराष्ट्रीय ख्यातीचे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, आधुनिक भारतीय कलाकार सय्यद हैदर रझा उर्फ एस.एच. रझा यांचे दीर्घ आजाराने शनिवारी दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून रझा यांची प्रकृती ठीक नव्हती व त्यामुळेच त्यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर शनिवारी त्यांनी त्याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 
' शनिवारी सकाळी ११ वाजता रझा यांची प्राणज्योत मालवली' अशी माहिती रझा यांचे घनिष्ट मित्र व कवी अशोक वाजपेयी यांनी दिली. रझा यांच्या इच्छेनुसार, मध्य प्रदेशच्या मंडाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
१९८३ साली ललित कला अकादमीमध्ये रझा यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती झाली.
 
एस.एच. रझा यांनी नागपूरमधील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीला भेट दिली होती त्यावेळचे काही क्षण - 
 
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: Senior painter S.H. Raza Kalwash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.