वरिष्ठ पेन्शन योजना यंदापासून लागू होणार
By admin | Published: January 25, 2017 04:04 AM2017-01-25T04:04:58+5:302017-01-25T04:18:26+5:30
६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना किमान १० वर्षे ८ टक्के या निश्चित व्याजदरावर आधारित पेन्शनची हमी देणारी वरिष्ठ पेन्शन विमा योजना यंदाच्या वर्षी सुरू
नवी दिल्ली : ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना किमान १० वर्षे ८ टक्के या निश्चित व्याजदरावर आधारित पेन्शनची हमी देणारी वरिष्ठ पेन्शन विमा योजना यंदाच्या वर्षी सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.
समाजातील दुर्बल वर्गांना आर्थिक प्रगतीत सहभागी करून घेण्याच्या आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या सरकारच्या प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून ही योजना राबविण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या सरकारी पत्रकानुसार, ‘वरिष्ठ पेन्शन बिमा योजना २०१७’ नावाची योजना सुरू झाल्यापासून एक वर्षापर्यंत सदस्य नोंदणीसाठी खुली राहील.
आयुर्विमा महामंडळास या योजनेत जमा होणारा निधी गुंतवून, त्यावर मिळणारा परतावा ८ टक्क्यांहून कमी असला, तर फरकाची रक्कम केंद्र सरकार महामंडळास दरवर्षी अनुदान म्हणून देईल व अशा प्रकारे योजनेच्या सदस्यांना किमान
१० वर्षे ८ टक्के व्याजदरावर आधारित ठरावीक पेन्शन मिळत राहील, याची खात्री केली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र बँकेत पाठवणार
एलआयसीतर्फे ही योजना राबविली जाईल व त्याद्वारे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना सामाजिक सुरक्षा देण्याखेरीज भविष्यात व्याजदर कमी झाले, तरी ठरावीक खात्रीशीर दराने पेन्शन मिळण्याची हमी दिली जाईल. या योजनेत किमान १० वर्षे ८ टक्के असा निश्चित व्याजदर गृहित धरून त्या आधारे पेन्शनचा हिशेब केला जाईल. वर्गणीदारास त्याची पेन्शन तिमाही, सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल.