ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरा यांचं निधन
By admin | Published: January 17, 2017 09:27 PM2017-01-17T21:27:11+5:302017-01-17T21:27:11+5:30
जेष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरा यांचं सोमवारी रात्री निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 17 - दोन कृष्णविवरांचा आघात होऊन ते एकमेकात विलीन होऊन एकच कृष्णविवर तयार होते व त्या वेळी गुरुत्वीय लहरी बाहेर पडतात, असे भाकित करणारे जेष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरा यांचं सोमवारी रात्री निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.
सी. व्ही. विश्वेश्वरा यांना विशु नावाने ओळखले जात होते. त्यांनी 1970 साली मेरीलँड येथील विद्यापीठातून शिक्षण घेत असताना पहिल्यांदा कृष्णविवरांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी दोन कृष्णविवरांचा एकमेकांवर आघात होऊन ते एकमेकात विलीन होऊन एकच कृष्णविवर तयार होते आणि त्यावेळी गुरुत्वीय लहरी बाहेर पडतात, असे भाकित त्यांनी वर्तविले होते.
सी. व्ही. विश्वेश्वरा यांच्यामागे त्यांची पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या दोन्ही मुली सुद्धा शास्त्रज्ञ आहेत.