इन्फोसिसमधील घडामोडींमुळे दु:ख - नारायणमूर्ती

By admin | Published: February 11, 2017 01:37 AM2017-02-11T01:37:55+5:302017-02-11T01:41:11+5:30

सध्या इन्फोसिमध्ये जे काही सुरू आहे, त्यामुळे मी दु:खी झालो आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे सह संस्थापक आणि पहिले चेअरमन एन. आर. नारायणमूर्ती यांनी केले आहे.

Sense of Infosys - Narayana Murthy | इन्फोसिसमधील घडामोडींमुळे दु:ख - नारायणमूर्ती

इन्फोसिसमधील घडामोडींमुळे दु:ख - नारायणमूर्ती

Next

बंगळूर : सध्या इन्फोसिमध्ये जे काही सुरू आहे, त्यामुळे मी दु:खी झालो आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे सह संस्थापक आणि पहिले चेअरमन एन. आर. नारायणमूर्ती यांनी केले आहे.
नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाकडे कंपनीचे ३.४४ टक्के समभाग असून, हे सर्वाधिक एकल समभाग आहेत. कंपनीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का आणि संस्थापक सदस्य यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद सुरू असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मूर्ती यांच्या वक्तव्यास महत्त्त्व प्राप्त होते. मूर्ती म्हणाले की, विशाल सिक्का यांच्याबाबत काहीच वाद नाही. वाद आहे तो कंपनीमध्ये हरवत चाललेल्या उत्त्तम प्रशासनाचा. डेव्हीड केनेडी यांची कंपनी यांना कंपनीत घेण्यात आले तेव्हा १२ महिन्यांच्या पृथक्करण वेतनाची अट मान्य करण्यात आली. अन्य कंपन्यांत ३ महिन्यांचीच अट आहे. माजी सीएफओ राजीव बन्सल यांनी कंपनी सोडली तेव्हा त्यांना ३0 महिन्यांचे पृथक्करण वेतन देणे योग्य होते का? इन्फोसिसच्या नियमापेक्षा हे वेतन दहापट अधिक होते. अशा अभूतपूर्व वेतनामागील कारण काय आहे? असे अनेक प्रश्न मूर्ती यांनी उपस्थित केले. नोकरी सोडल्यानंतरही काही कार्यकारींना देण्यात येणाऱ्या वेतनास पृथक्करण वेतन म्हटले जाते.

Web Title: Sense of Infosys - Narayana Murthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.