आदर्श नगरात घरांना पाण्याचा वेढा कायम...
By admin | Published: July 12, 2016 12:08 AM2016-07-12T00:08:07+5:302016-07-12T00:08:07+5:30
आदर्शनगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये असलेल्या सहा घरांच्या समोरील सात फुटाच्या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. यामुळे येथील रहिवासी साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधूबाई साठे, प्रताप चव्हाण, रवींद्र मिश्रा यांना पाण्यातूनच मार्ग काढून घरात जावे लागत होते.
Next
आ र्शनगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये असलेल्या सहा घरांच्या समोरील सात फुटाच्या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. यामुळे येथील रहिवासी साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधूबाई साठे, प्रताप चव्हाण, रवींद्र मिश्रा यांना पाण्यातूनच मार्ग काढून घरात जावे लागत होते. पाऊस थांबण्याची प्रतीक्षा....सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठ व इतर व्यवहारांवर परिणाम होण्यासह अनेकांना कामानिमित्त बाहेर पडता येत नसल्याने हा पाऊस थांबण्याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. त्यात भीजपावसामुळे अनेक भागात रस्ते चिखलमय झाल्याने आता पावसाने विश्रांती घेण्याची गरज असल्याचे नागरिक म्हणू लागले आहे. शहरात ५५ मि.मी. पावसाची नोंद....शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅली येथील पर्जन्यमापकानुसार सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत शहर व परिसरात ५५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सकाळी साडे सहा वाजेपर्यंत ४३.८ मि.मी. पाऊस झाला व त्यानंतर आठ तासात १२ मि.मी. पावसाची त्यात भर पडून तो दुपारी तीनपर्यंत ५५ मि.मी. पर्यंत पोहचला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसरत....रविवारी सुी असल्याने पावसामुळे काही अडचण जाणवली नाही, मात्र सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कार्यालयात जाणार्यांसह शाळा, महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांना पावसामुळे ताटकळत रहावे लागले. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर अनेक जण रेनकोट, छत्री घेऊन बाहेर पडले.