सेन्सेक्स १५२ अंकांच्या घसरणीसह २३ हजारावर बंद
By admin | Published: February 29, 2016 04:13 PM2016-02-29T16:13:18+5:302016-02-29T20:40:00+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला निराश केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला निराश केले आहे. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५२ अंकांच्या घसरणीसह २३ हजारांच्या जवळ बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४३ अंकांची घसरण नोंदवत ६९८७ अंकांवर बंद झाला.
अर्थसंकल्पाचे वाचन सुरु असताना सेन्सेक्सने ५५० अंकांची गंटागळी खाल्ली होती. मात्र अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर आणि दीर्घकालीन उपायोजना असल्याने दिवसअखेर सेन्सेक्स १५२ अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने २३,३४३ ही सर्वोच्च आणि २२,४९४ ही नीचांकी पातळी गाठली होती. निफ्टीही अधिकतम ७०९४ आणि ६८२५ या नीचांकी पातळीला आला होता.
ओएनजीसी, मारुती सुझूकी, भेल, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक आणि पावर ग्रिड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बँकिंग, धातू आणि बांधकाम क्षेत्राच्या शेअर्सनी वाढ नोंदवली.