सेन्सेक्स १७0 अंकांनी घसरला

By Admin | Published: April 29, 2015 11:30 PM2015-04-29T23:30:35+5:302015-04-29T23:30:35+5:30

बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा आपटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७0.४५ अंकांनी घसरून २७,२२५.९३ अंकांवर बंद झाला.

The Sensex dropped by 170 points | सेन्सेक्स १७0 अंकांनी घसरला

सेन्सेक्स १७0 अंकांनी घसरला

googlenewsNext

मुंबई : बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा आपटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७0.४५ अंकांनी घसरून २७,२२५.९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५.८५ अंकांनी घसरून ८,२३९.७५ अंकांवर बंद झाला.
मंगळवारी शेअर बाजारांत सुधारणा झाली होती. सेन्सेक्स २१९ अंकांनी वाढला होता. मात्र हे सकारात्मक वातावरण बाजाराला टिकवून ठेवता आले नाही. एप्रिलमधील डेरिव्हेटिव्ह करारांची मुदत उद्या संपत आहे. त्याच बरोबर विदेशी संस्थांकडून बाजारात विक्रीचा मारा झाला. याचा फटका बाजाराला बसला. भूमी अधिग्रहण विधेयकाला केंद्राकडून विलंब होत असल्यामुळेही बाजारावर दबाव वाढत आहे.
भारती एअरटेलची मार्चला संपलेल्या तिमाहीतील कामगिरी समाधानकारक राहिली नाही. त्याचा मोठा फटका आज कंपनीला बसला. कंपनीचा समभाग ३.३२ टक्क्यांनी घसरला. या तिमाहीत कंपनीला ३0.५ टक्के वाढीसह १,२५५ कोटींचा नफा झाल्याचे काल जाहीर करण्यात आले होते. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळीच नरमाईने २७,३९५.७१ अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो आणखी घसरून २७,१७६.५४ अंकांवर गेला. नंतर त्यात थोडी सुधारणा झाली होती. तथापि, दुपारच्या सत्रात विक्रीचा जोर वाढल्यामुळे सेन्सेक्स सत्र अखेरीस २७,२२५.९३ अंकांवर बंद झाला. १७0.४५ अंक अथवा 0.६२ टक्के घसरण त्यात झाली. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५.८५ अंक अथवा 0.५५ टक्क्यांच्या घसरणीसह ८,२३९.७५ अंकांवर बंद झाला.



तत्पूर्वी तो सतत खाली-वर होत होता.
सध्या बाजार दबावात आहे. सकारात्मक अशी कोणतीही बाब सध्या गुंतवणूकदारांना बाजारात दिसत नाही, असे ब्रोकरांनी सांगितले.
आशियाई बाजारात नरमाईचा कल दिसून आला. युरोपीय बाजारातही सकाळच्या सत्रात नरमाईचा कल राहिला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या दोनदिवसीय बैठकीचे सावट बाजारावर दिसून आले.

४सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे समभाग घसरले. केवळ ७ कंपन्यांचे समभाग वर चढले. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक मात्र वर चढल्याचे दिसून आले. स्मॉलकॅप १.१0 टक्क्यांनी, तर मिडकॅप 0.३९ टक्क्यांनी वाढला. तत्पूर्वी काल विदेशी संस्थांनी १,५३२.८४ कोटी रुपयांचे समभाग विकले.

Web Title: The Sensex dropped by 170 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.