लष्कराच्या कारवाईचा शेअर बाजाराला फटका, सेन्सेक्स ४६५ अंकांनी कोसळला
By Admin | Published: September 29, 2016 01:13 PM2016-09-29T13:13:31+5:302016-09-29T17:31:13+5:30
भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईचे पडसाद शेअर बाजारात उमटले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. गुरुवारी दिवसअखेर सेन्सेक्स ४६५ अंकांनी कोसळून २७,८२७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५३ अंकांनी कोसळून ८,५९१ अंकांवर बंद झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये दिवसअखेर ४६ पैशांची घसरण झाली. नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय लष्कराने तुफानी हल्ले चढवत उरीच्या हल्ल्याचा बदला घेतला.
भारताने पाकिस्तानविरोधात अनेक आघाड्या उघडण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये पाकिस्तानविरोधातला शस्त्रसंधी करार मोडण्याचीही शक्यता आहे. याचा अर्थ भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकतं. याची चुणूक काल रात्री उशीरा भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईच्या माध्यमातून दिसून आला आहे.
आणखी वाचा
मात्र, युद्ध झाले तर त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, हे हेरून बाजारामध्ये निराशेचे वातावरण पसरले आणि विक्रीचा धडाका लागला. यामुळे 12.45 च्या सुमारास सेन्सेक्स 452 अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक 155 अंकांनी कोसळला.