संथारा व्रत : सुधारीत इंट्रो व हेडिंग

By Admin | Published: August 11, 2015 12:36 AM2015-08-11T00:36:37+5:302015-08-11T00:36:37+5:30

संथारा व्रतावर हायकोर्टाची बंदी

Senthara fast: improved intro and heading | संथारा व्रत : सुधारीत इंट्रो व हेडिंग

संथारा व्रत : सुधारीत इंट्रो व हेडिंग

googlenewsNext
थारा व्रतावर हायकोर्टाची बंदी
जयपूर : अन्न-पाण्याचा त्याग करून स्वेच्छेने देहत्याग करण्याचेे जैन धर्मीयांचे संथारा व्रत म्हणजे आत्महत्या असल्याचा निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. व्रतावर बंदी घालणारा हा निकाल राजस्थान राज्यापुरताच मर्यादित असला तरी त्याने देशभरातील जैन समाजात खळबळ उडाली असून याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी समाजाच्या अनेक संस्थांनी लगेच सुरू केली आहे.
...................................................

आणखी प्रतिक्रिया
हा तर न्यायालयाचा धर्मात हस्तक्षेप
जैन धर्मात संथारा व्रताला स्वीकृती दिलेली आहे. संथारा किंवा समाधी मरण हा धर्मगुरू आणि कुटुंबाच्या स्वीकृतीचा विषय आहे. प्रत्येकालाच याची स्वीकृती दिली जात नाही. याला मोक्षाच्या प्राप्तीची प्रक्रिया मानले जाते. संविधान धर्मपालनाची पूर्ण स्वीकृती प्रदान करते. उच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे धर्मामध्ये हस्तक्षेप आहे. समाज याबाबत आपले म्हणणे सर्वोच्च न्यायालयात मांडेल. हा हत्या अथवा आत्महत्येचा विषय नसून स्वनिर्णयाचा आहे. या निर्णयाची संपूर्ण प्रत मिळाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल.
-संतोष बोरा, वरिष्ठ अधिवक्ता, उच्च न्यायालय (माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय)
.......................................................
सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
संथारा व्रताची जैन ग्रंथांमध्ये अनुमती दिलेली आहे आणि ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो; पण समाजाकडून या निकालाला आव्हान देण्याची तयारी केली जात आहे. संथारा ही धार्मिक मान्यताप्राप्त परंपरा आहे. यात व्यक्ती संपूर्ण सांसारिक दायित्वांपासून मुक्त झाल्यावर मोक्षाच्या कामनेने संथारा व्रत घेते. याला जीवनाची अंतिम तपस्या असेही म्हटले जाते.
-राजेंद्र डागा, जैन समाज सदस्य व वरिष्ठ अधिवक्ता

Web Title: Senthara fast: improved intro and heading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.