Corona Vaccine: लहान मुलांसाठी वेगळी कोरोना लस बनवणं झालं आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 05:29 AM2021-02-09T05:29:52+5:302021-02-09T07:25:59+5:30

बालकांना संसर्गाचा कमी धोका; होऊ शकतात विषाणूंचे वाहक

separate corona vaccine was needed for small children | Corona Vaccine: लहान मुलांसाठी वेगळी कोरोना लस बनवणं झालं आवश्यक

Corona Vaccine: लहान मुलांसाठी वेगळी कोरोना लस बनवणं झालं आवश्यक

Next

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा लहान मुलांना सर्वात कमी धोका असला तरी, ते या विषाणूचे मोठे वाहक  ठरू शकतात. त्यामुळे निष्क्रिय विषाणूपासून मुलांसाठी कोरोना लस बनविणे आवश्यक बनले आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारत बायोटेक अशी लस बनविणार आहे.

भारत बायोटेक कंपनीने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस बनविण्याची तयारी दर्शविली आहे. केंद्राने परवानगी दिल्यास या महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या प्रारंभी या लसीच्या मानवी चाचण्या सुरू करण्याचा भारत बायोटेकचा विचार आहे. 

१६ वर्षे वयाखालील मुलांसाठी निष्क्रिय विषाणूपासून लस बनवावी, असा आंतरराष्ट्रीय नियम आहे. सक्रिय विषाणूपासून बनविलेली लस मुलांना देण्यात येत नाही. भारतात आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस निष्क्रिय विषाणूपासून बनविण्यात आली आहे. चिपांझीमध्ये इन्फ्लूएन्झा ज्यामुळे होतो, त्या एडेनो व्हायरसपासून ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाने कोविशिल्ड लस विकसित केली आहे. ही लसही भारतात लसीकरण मोहिमेत वापरली जात आहे. अमेरिका व युरोपमधील फायझर-बायोएनटेक व मॉडेर्ना कंपनीच्या लसी एमआरएनए प्रकारातील आहेत. 

उपचार घेणाऱ्यांची संख्या दीड लाखांहून कमी
देशात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होऊन ते १.३७ टक्के झाले आहे. या रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार आहे. कोरोना संसर्गातून १ कोटी ५ लाख ३४ हजार लोक बरे झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९७.२० टक्के झाले आहे.  देशात कोरोनाचे १,०८,३८,१९४ रुग्ण असून, त्यातील १,०५,३४,५०५ रुग्ण बरे झाले. या संसर्गामुळे सोमवारी ८१ जण मरण पावले.
कोरोनामुळे दररोज बळी जात असलेल्यांची संख्या १०० पेक्षा कमी असण्याची ही या महिन्यातील चौथी वेळ आहे. कोरोना बळींचा एकूण आकडा १,५५,०८० झाला आहे. सोमवारी कोरोनाचे ११,८३१ रुग्ण आढळले, तर ११,९०४ बरे झाले. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४३ टक्के आहे. 

Web Title: separate corona vaccine was needed for small children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.