फुटीरवाद्यांच्या मिरवणुकीत पाकी ध्वज!

By Admin | Published: April 16, 2015 01:20 AM2015-04-16T01:20:15+5:302015-04-16T09:38:00+5:30

गेल्या महिन्यातच कारागृहातून मुक्त झालेला फुटीरवादी नेता मसरत आलम याच्यासह गिलानींच्या अनेक समर्थकांनी हातात पाकिस्तानी ध्वज घेऊन पाकिस्तानच्या समर्थनात प्रचंड नारेबाजी केली.

Separate procession flags! | फुटीरवाद्यांच्या मिरवणुकीत पाकी ध्वज!

फुटीरवाद्यांच्या मिरवणुकीत पाकी ध्वज!

googlenewsNext

गिलानीची जाहीर सभा : काश्मीरमध्ये तणाव
श्रीनगर : हुरियत कॉन्फरन्सच्या कट्टरपंथी गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी बुधवारी येथे घेतलेल्या जाहीर सभेत गेल्या महिन्यातच कारागृहातून मुक्त झालेला फुटीरवादी नेता मसरत आलम याच्यासह गिलानींच्या अनेक समर्थकांनी हातात पाकिस्तानी ध्वज घेऊन पाकिस्तानच्या समर्थनात प्रचंड नारेबाजी केली. त्यातून काश्मीरमधील तणावात कमालीची भर पडली.
जम्मू-काश्मीर सरकारने तब्बल पाच वर्षांनी गिलानीस जाहीर सभेची परवानगी दिली होती. दिल्लीतील तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर बुधवारी गिलानीचे श्रीनगरात आगमन झाले त्यावेळी विमानतळावरून त्याच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे नेतृत्व बेकायदेशीर कारवाया नियंत्रण कायद्याखाली गुन्हा दाखल असलेल्या मसरत आलमने केले. त्याला पुन्हा अटक होण्याची शक्यता असल्याचे एका अधिकृत सूत्राने सांगितले. राज्यात पीडीपी-भाजपा युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्याच महिन्यात आलमची सुटका करण्यात आली. त्यावरून केंद्र आणि राज्यात तसेच सत्ताधारी आघाडीतही संघर्षाची ठिणगी पडली होती. बुधवारीही भाजपाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून कायदे मोडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची सूचना राज्य सरकारला देण्याची मागणी केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांच्याकडे केली. तर काँग्रेसने भाजपाची फिरकी घेत विकासाची एवढीच चिंता असेल तर सरकारमधून बाहेर पडा,असे आव्हान दिले. काश्मिरात २०१० साली शंभराहून अधिक बळी घेणाऱ्या हिंसक आंदोलनात मसरतचा हात होता. त्या आंदोलनानंतरची गिलानीची ही पहिलीच सभा होती. काश्मीर हा केवळ भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सीमावाद नसून राज्यातील एक कोटी लोकांच्या भावनेचा प्रश्न असल्याचे त्याने यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Separate procession flags!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.