सप्टेंबरमध्येच राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा

By admin | Published: September 27, 2014 11:18 PM2014-09-27T23:18:11+5:302014-09-27T23:18:11+5:30

- विदर्भाचे तापमान ३५ अंशाच्या पुढे

The September hit hit in the state in September | सप्टेंबरमध्येच राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा

सप्टेंबरमध्येच राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा

Next
-
िदर्भाचे तापमान ३५ अंशाच्या पुढे
पुणे : सप्टेंबर महिना संपण्यास काही दिवस शिल्लक असतानाच राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा बसू लागल्या आहेत. अनेक शहरांचे तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान वाढ झाली आहे. सर्वाधिक ३६.५ अंश सेल्सिअस तापमान शनिवारी ब्रम्हपुरी येथे नोंदविले गेले. तर, गेल्या २४ तासात कोकणात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
राज्यातील सर्वच शहरांचे कमाल तापमान शनिवारी सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांनी वाढले आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा राज्यात अनेक ठिकाणी जाणवू लागल्या आहेत. ब्रम्हपुरीपाठोपाठ जळगावचे तापमान ३६.२ अंश सेल्सिअस होते. तर अकोला, परभणी, नागपूर, वर्धा शहरांचे तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले होते.
गेल्या २४ तासांत कुडाळ येथे ४० मिमी, कणकवलीमध्ये ३०, वेंगुर्ला, रोहा येथे २०, सावंतवाडी, अलिबाग, मालवण येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडला. पुढील ४८ तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Web Title: The September hit hit in the state in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.