कोरोनाचे गंभीर संकट; पहिल्या तिमाहीत GDP मध्ये ऐतिहासिक 23.9 टक्क्यांची घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:35 PM2020-08-31T18:35:15+5:302020-08-31T18:35:41+5:30
कोविड-१९ लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्था इतिहासातील सर्वात गंभीर मंदीतून जात आहे. परिणामी २०२०-२१ या चालू वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ४५ टक्के कमी होऊ शकते, असे भाकीत अमेरिकन मर्चंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅक्सने वर्तविले आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर संकट आलेले असताना त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम दिसून आला आहे. देशाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल घरेलू उत्पादनात (GDP) 23.9 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदिविली गेली आहे. केंद्रीय मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या तिमाहिचे आकडे जाहीर केले आहेत.
काही वेळापूर्वी मुख्य सेक्टरच्या आकड्यांनीही निराश केले होते. जुलै महिन्य़ामध्ये आठ इंडस्ट्रीच्या उत्पादनांमध्ये 9.6 टक्के घट झाली आहे. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत स्थिर किंमतीवर म्हणजेच रियल जीडीप 26.90 लाख कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ही जीडीपी 35.35 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे यामध्ये 23.9 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी जीडीपीमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती.
देशात लॉकडाऊन असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात सारे काही बंद होते. यामुळे अर्थव्यवस्थाच ठप्प झाली होती. जूनमध्ये याला थोडा वेग आला होता. यामुळे रेटिंग एजन्सी आणि अर्थतज्ज्ञांनी जून तिमाहीमध्ये जीडीपीदरात 16 ते 25 टक्के घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. आज झालेली घसरण ही ऐतिहासिक आहे.
तज्ज्ञांचे अंदाज
कोविड-१९ लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्था इतिहासातील सर्वात गंभीर मंदीतून जात आहे. परिणामी २०२०-२१ या चालू वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ४५ टक्के कमी होऊ शकते, असे भाकीत अमेरिकन मर्चंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅक्सने वर्तविले आहे. अर्थतज्ज्ञ प्राची मिश्रा व अॅर्न्ड्यू टिल्टन यांनी तयार केलेल्या अहवालात भारताने लॉकडाउन संपल्यानंतर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी २६५ अब्ज डॉलर्सचे (२१ लाख कोटी रुपये) पॅकेज तयार केल्याचा उल्लेख केला आहे. भारताची अर्थव्यवस्था २०२०-२१ वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीपासून वाढायला सुरुवात होईल व जीडीपी दर २० टक्के असेल, तर चौथ्या जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत हा दर १४ टक्के असेल.