BREAKING: 'सीरम इंस्टिट्यूट'ला सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाली, किंमतही केली जाहीर
By मोरेश्वर येरम | Published: January 11, 2021 05:09 PM2021-01-11T17:09:26+5:302021-01-11T17:32:07+5:30
पुण्याच्या 'सीरम इंस्टिट्यूट'ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाली
नवी दिल्ली
देशात लवकरच कोरोना लशीकरणाला सुरुवात होणार आहे. पुण्याच्या 'सीरम इंस्टिट्यूट'ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे.
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने पहिली ऑर्डर दिल्याचं वृत्त एएनआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे. यासोबत लशीची किंमत देखील समोर आली आहे. लशीच्या एका डोसची किंमत २०० रुपये इतकी असणार असल्याची माहिती सीरम इन्सिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
The vaccine would be available at the price of Rs 200 per vial: Serum Institute of India (SII) officials#COVID19https://t.co/9NdDRYXrGj
— ANI (@ANI) January 11, 2021
देशात १६ जानेवारीपासून लसीकरण
सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशील्ड लशीची निर्मिती केली आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल.
लशीच्या वाहतुकीसाठी सज्ज
सीरम इंस्टिट्यूटकडून लशीच्या वाहतुकीसाठीची देखील तयारी पूर्ण झाली आहे. कूल-एक्स कोल्ड चैन लिमिटेट कंपनी देशाच्या कानाकोपऱ्या लशीची वाहतूक करणार आहे. सीरम इंस्टिट्यूटबाहेर कोल्ड स्टोरेज वाहनं देखील सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Maharashtra: Kool-ex Cold Chain Ltd in Pune prepared to transport the COVID19 vaccines from Serum Institute of India to other parts of the country. pic.twitter.com/F4F4wI0H3f
— ANI (@ANI) January 11, 2021