देशवासीयांना २२५ रुपयांत मिळणार कोरोनावरील लस, सीरमने केलं जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 06:50 AM2020-08-08T06:50:24+5:302020-08-08T06:50:50+5:30

सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी टिष्ट्वटरद्वारे ही माहिती दिली आहे

Serum vaccine will be available in India for Rs 225 | देशवासीयांना २२५ रुपयांत मिळणार कोरोनावरील लस, सीरमने केलं जाहीर

देशवासीयांना २२५ रुपयांत मिळणार कोरोनावरील लस, सीरमने केलं जाहीर

Next

पुणे : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लस विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असूना भारतासह जगभरातील गरीब देशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडून अवघ्या २२५ रुपयांत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सिरमसोबत ‘गावी’ (जीएव्हीआय) ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून आर्थिक सहकार्य मिळणार आहे. याअंतर्गत पुढील वर्षीपर्यंत लसीच्या १० कोटी डोसचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी टिष्ट्वटरद्वारे ही माहिती दिली आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित केलेल्या लशीच्या दुसऱ्या व तिसºया टप्प्यातील मानवी चाचणी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘सिरम’ला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार या लशीच्या मानवी चाचण्यांना लवकरच सुरूवात होणार आहे. आॅक्सफर्डने

केलेल्या पहिल्या चाचणीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने या लशीबाबत आशादायक चित्र निर्माण झाले आहे. या लशीच्या निर्मितीसाठी सिरमसोबत ‘अ‍ॅॅस्ट्राझेनेका’ या कंपनीने करार केला आहे. तसेच अमेरिकेतील ‘नोव्हाव्हॅक्स’ या कंपनीशीही लसनिर्मितीसाठी करार केला आहे. आता या लशींच्या निर्मितीसाठी ‘गावी’ व गेट्स फाऊंडेशनही पुढे सरसावले आहे. या लसींच्या मानवी चाचणी यशस्वी झाल्यास निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेट्स फाऊंडेशनकडून ‘गावी’ला ११२५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून या निधीतून ‘गावी’कडून सिरमला लस उत्पादनासाठी सहकार्य केले जाईल. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांना तीन डॉलर्स म्हणजे केवळ २२५ रुपयांत मिळू शकेल. भारतासह जगभरातील ९२ गरीब देशातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी असलेल्या ‘सिरम’ला या सहकार्यामुळे लशींच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य होणार आहे. या देशांना २०२१ च्या सुरूवातीलाच १० कोटी लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘सिरम’वर असेल. तसेच गरज भासल्यास आणखी लशींचा पुरवठा केला जाणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी गरीब देशांमध्ये परवडणाºया दरात आरोग्य सुविधा व उपचार मिळायला हवेत. अधिकाधिक लसीकरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘गावी’व गेट्स फाउंडेशनचे सहकार्य मिळाले असून २०२१ मध्ये भारतासह अन्य गरीब देशांना १० कोटी डोस पुरविले जातील.
- अदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इन्स्टिट्यूट.

Web Title: Serum vaccine will be available in India for Rs 225

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.