सेवा मंडळ मंदिराची भव्य तीन मजली इमारत होणार तयार
By admin | Published: October 28, 2015 12:05 AM2015-10-28T00:05:51+5:302015-10-28T00:05:51+5:30
नियोजन: सर्व सोयीयुक्त अद्ययावत असणार इमारत
Next
न योजन: सर्व सोयीयुक्त अद्ययावत असणार इमारतजळगांव: येथील पूज्य सेवा मंडळाच्या तीन मजली अद्ययावत भव्य मंदिर तयार करण्याबातचे नियोजन सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे. लवकरच या मंदिराच्या बांधकामास सुरुवात करण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोक मंधान यांनी दिली.येथील सिंधी सेवा मंडळाची सद्याच्या इमारत पडून याच ४२ हजार स्क्वे फुटावर भव्य आरसीसी तीन मजली मंदिराचे बांधकाम करण्याचा ट्रस्टचे नियोजन आसून मंदिर भविष्यात पाच मजल्या पर्यंत करण्याच्या नियोजन असणार आहे. तयार करण्यात येणार आहे.वास्तुशास्त्राचा आभ्यास व मुंबईचे अभियंता सुभाष भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबी व आराखडा तयार करून मंदिराचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. बांधकामा दरम्यान मंदिरातील संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलारालम साहेब, संत कंवरराम साहेबमूर्ती व अखंड ज्योती या जागच्या जागीच असतील. मंदिरात संपूर्ण देश, विदेशातून येणार्या संतांसाठी संत निवास, नरात्रीचा नवस फेडण्यासाठी येणार्या भाविकांसाठी राहण्याची सोय. वर्षभारत आयोजित होणार्या विविध कार्यक्रामंसाठी येणार्या भक्तांची भोजन व्यवस्था, मंडप, व्यवस्था या मंदिरातअसणार आहे. मंदिरात पार्किंगची सुविधा सुध्दा देण्यात येणार आहे. मंदिराच्या बांधकामासाठीच्या खर्चाबाबतअंदाज घेण्यात आलेला नही मात्र देश भरातून मंदिरात येणार्याभाविकांना याबात माहिती देण्यात येणार आहे. भाविकांकडून काही प्रमाणात निधी एकत्र करता येऊ शकतो.प्रति हरिद्वारमंदिर सुसज्ज व अद्ययावत असेल. मंदिरात सर्वसुविधांची पूर्तता करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात हरिद्वार ची प्रतिमा असते त्याच पद्धतीने प्रति हरिद्वार धरतीवर मंदिराचे निर्माण असल्याचे सांगण्यात आले.