विहिंप सेवा कार्यात वाढ करणार सेवा विभाग प्रमुख बैठक: प्रवीण तोगडियांची उपस्थिती

By admin | Published: November 28, 2015 11:52 PM2015-11-28T23:52:47+5:302015-11-28T23:52:47+5:30

जळगाव : विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात ६० हजाराहून अधिक सेवाकार्ये सुरू आहेत. आगामी काळात त्यात भरीव वाढ करून भारत मातेची सेवा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे व्यक्त केला.

Service Meeting of Service Department to Increase VHP Service Work: Pravin Togadia's Presence | विहिंप सेवा कार्यात वाढ करणार सेवा विभाग प्रमुख बैठक: प्रवीण तोगडियांची उपस्थिती

विहिंप सेवा कार्यात वाढ करणार सेवा विभाग प्रमुख बैठक: प्रवीण तोगडियांची उपस्थिती

Next
गाव : विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात ६० हजाराहून अधिक सेवाकार्ये सुरू आहेत. आगामी काळात त्यात भरीव वाढ करून भारत मातेची सेवा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे व्यक्त केला.
विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय सेवा विभाग प्रमुखांच्या दोन दिवसीय बैठकीचे कुुसंुबा येथील गोशाळेत आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून सेवा विभागातील काम करणार्‍या ६० प्रमुख प्रतिनिधींची उपस्थिती आहे. या परिषदेला केंद्रीय सहसंघटनमंत्री विनायक देशपांंडे, गोसेवक रतनलालजी बाफना, संतपद आश्रम फैजपूरचे गादीपती जनार्दन हरिजी महाराज, प्रांत अध्यक्ष आप्पा बारगजे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र मुंदडा, केंद्रीय मंत्री अरविंद ब्रšाभट आदी प्रमुखांची उपस्थिती होती.
सेवा कार्यात वाढ होणार
विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात ६० हजारांहून अधिक सेवाकार्ये सुरू असून त्यात वाढ करण्याचा संकल्प तोगडिया यांनी व्यक्त केला. देशभरातील धनिकांनी या कार्यास मदत करून भारत मातेची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले. हिंदू हेल्पलाईन, इंडिया हेल्पलाईन व डॉक्टर हेल्पलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरजूंना मदत व सेवा पुरविण्याचे काम देशभरात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रतनलाल बाफना, जनार्दन हरिजी महाराज, विनायक देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. विहिंपचे अशोक सिंघल, मुकुंदराव पणशीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
-----
बाफनाजींचा गौरव
कुुसंुबा येथील गोसेवा केंद्राच्या माध्यमातून रतनलाल बाफना हे गोसेवा करत आहेत. या कार्याचा गौरव करत बाफना यांचा यावेळी तोगडियांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
----
शेवटी सुरेंद्र मुंदडा यांनी आभार व्यक्त केले. विहिंंप, बजरंग दलाच्या कार्यकर्ते बैठक यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
-----
रविवारी दुसरे सत्र
रविवारी या बैठकीचे दुसरे सत्र आहे. दुसर्‍या सत्रात सेवा कार्याच्या वाढीत देशभरात काय उपक्रम राबविता येतील या विषयी विचार मंथन केले जाणार आहे.
------
तीन कॉलम फोटो

Web Title: Service Meeting of Service Department to Increase VHP Service Work: Pravin Togadia's Presence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.