साखर कारखान्यांच्या सेवेसाठीच धरणे!

By admin | Published: April 27, 2016 06:02 AM2016-04-27T06:02:48+5:302016-04-27T06:02:48+5:30

हाराष्ट्रातील धरणे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर साखर कारखान्यांची सेवा करण्यासाठी बांधण्यात आली आहेत

For the service of sugar factories! | साखर कारखान्यांच्या सेवेसाठीच धरणे!

साखर कारखान्यांच्या सेवेसाठीच धरणे!

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील धरणे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर साखर कारखान्यांची सेवा करण्यासाठी बांधण्यात आली आहेत, असा आरोप करून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी मंगळवारी लोकसभेत महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या काँग्रेस सरकारांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राज्यातील दुष्काळावर सभागृहात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून सत्तारूढ पक्ष
आणि विरोधकांमध्ये वाक्युद्ध भडकले.संपुआच्या राजवटीचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करताना सिंग म्हणाले, ‘मागील अनेक वर्षांपासून राज्यांना मनरेगा योजनेअंतर्गत उशिरा म्हणजे जुलै-आॅगस्टमध्ये निधी मिळत आला होता. परंतु रालोआ सरकारने अर्थसंकल्प मंजूर झाल्याच्या २४ तासांतच हा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.’ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीवर विचारण्यात आलेल्या आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात कृषिमंत्री सिंग म्हणाले, असे ८० सिंचन प्रकल्प मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहेत. आता सरकारने त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरविले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेस-भाजपात उडाली चकमक
च्महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याला सरकार दुष्काळी मदत करणार काय, या शिवसेनेच्या सदस्याने प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या पूरक प्रश्नाला कृषिमंत्री सिंग हे उत्तर देत असताना; ही मदत अन्य दुष्काळी जिल्ह्णांनाही मिळणार आहे काय, असा प्रश्न काँग्रेस सदस्यांनी विचारला. मध्येच विचारलेल्या या प्रश्नामुळे सिंग संतप्त झाले आणि काँग्रेस सदस्यांना उद्देशून म्हणाले, ‘माझे उत्तर ऐकून घेण्यासाठी जरा धैर्य बाळगा. च्शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी नव्हे तर साखर कारखान्यांचे हित जपण्यासाठीच महाराष्ट्रात धरणे बांधण्यात आली आहेत, असा आरोप सिंग यांनी केला. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा व्हावी अशी माझी मागणी आहे, जेणेकरून सत्य उघड होऊ शकेल.’च्सिंग यांच्या या आरोपावरून काँग्रेस सदस्य भडकले. यावेळी काँग्रेस आणि
सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या. काही काँग्रेस सदस्यांनी सिंग यांच्याशी वाद घातला.

Web Title: For the service of sugar factories!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.