...तर रेल्वे तिकीटावर नाही भरावा लागणार Service Tax
By admin | Published: February 1, 2017 12:03 PM2017-02-01T12:03:35+5:302017-02-01T14:54:56+5:30
यावर्षी प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातून मांडण्यात आला. यावर्षीचा रेल्वे अर्थसंकल्प 1 लाख 31 हजार कोटींचा
Next
style="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - यावर्षी प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पातून मांडण्यात आला. यावर्षीचा रेल्वे अर्थसंकल्प 1 लाख 31 हजार कोटींचा असेल. त्यासाठी 55 हजार कोटी रुपये सरकार देणार आहे.
रेल्वेसाठीच्या प्रमुख तरतुदी पुढील प्रमाणे
- रेल्वेसाठी केंद्र सरकारने 55 हजार कोटींची तरतूद केली आहे.
- रेल्वेने स्वच्छता आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रीत केले आहे.
- 2020 पर्यंत मानवरहीत रेल्वे क्रॉसिंग बंद करणार
- 2017-18 मध्ये 3500 किमीचे रेल्वे मार्ग उभारणार.
- मेट्रो रेल्वेसाठी नवीन धोरण आणणार, यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
- 500 रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवणार.
- IRCTCवरून ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही.
- पाचवर्षात 1 लाख कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी उभारणार.
- पर्यंटन व तीर्थयात्रांसाठी नवीन खास, गाड्या सुरू करण्यात येणार.
- 2019 पर्यंत रेल्वेतील सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट्सची सुविधा होणार उपलब्ध.
- 25 नवीन रेल्वे स्थानके बांधणार