जगन मोहन रेड्डींना धक्का, तिसऱ्या खासदाराने पक्ष सोडला; हे आहे एक्झिटचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:55 PM2024-01-23T18:55:47+5:302024-01-23T18:56:51+5:30

एकाच महिन्यात तिसऱ्या खासदाराने पक्ष सोडल्याने जगन मोहन रेड्डी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Set back for Jagan Mohan Reddy third MP quits party know the reason for the exit | जगन मोहन रेड्डींना धक्का, तिसऱ्या खासदाराने पक्ष सोडला; हे आहे एक्झिटचं कारण

जगन मोहन रेड्डींना धक्का, तिसऱ्या खासदाराने पक्ष सोडला; हे आहे एक्झिटचं कारण

Jagan Mohan Reddy ( Marathi News ) : आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वाएसआरसीपीचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण नरसरावपेट मतदारसंघातील खासदार लावू श्री कृष्ण देरायलु यांनी आपल्या खासदारकीसह वायएसआरसीपीच्या प्राथमिक सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकांना काही महिने बाकी असताना एकाच महिन्यात तिसऱ्या खासदाराने पक्ष सोडल्याने जगन मोहन रेड्डी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नरसरावपेट मतदारसंघातून वायएसआरसीपी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीय उमेदवाराला संधी देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे तिकीट कापलं जाण्याची भीती असल्याने खासदार लावू श्री कृष्ण देरायलु यांनी निवडणुका जाहीर होण्याआधीच पक्षाला रामराम ठोकला आहे. मागील निवडणुकीत मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो होतो आणि विकास हीच माझी प्राथमिकता आहे, असं त्यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे.

दरम्यान, लावू श्री कृष्ण देरायलु यांच्याआधी कुरनूल मतदारसंघातील खासदार संजीव कुमार आणि मछलीपट्टनमचे खासदार वल्लभानेनी बालाशोवरी यांनीही  वायएसआरसीपीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीत बदल करत काही खासदारांची तिकीटे कापण्याच्या चर्चेने खासदारांमध्ये अस्वस्थता असून त्यामुळेच राजीनामा सत्र सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

Web Title: Set back for Jagan Mohan Reddy third MP quits party know the reason for the exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.