पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी निघालेले; आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 11:26 AM2024-12-02T11:26:41+5:302024-12-02T11:27:26+5:30
हर्षवर्धन हे कर्नाटक कॅडर २०२३ चे अधिकारी होते. ट्रेनिंगनंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग मिळाली होती.
कर्नाटकच्या हासनमध्ये पहिल्याच पोस्टिंगवर जात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. हर्षवर्धन हे कर्नाटक कॅडर २०२३ चे अधिकारी होते. ट्रेनिंगनंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग मिळाली होती. यामुळे ते रविवारी पोस्टिंगच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कारने निघाले होते. यावेळी कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला.
हासन तालुक्यातील किट्टाने गावाजवळ टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याशेजारच्या घरावर व नंतर झाडावर जाऊन आदळली. हर्षवर्धवन हे होलेनरसीपूरला सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पोस्टवर पदभार स्वीकारण्यासाठी जात होते.
हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा चालक मंजेगौडा यांना किरकोळ दुखापत झाली आहे. राखीव सशस्त्र पोलीस दलाचे हे वाहन होते. हर्षवर्धन यांना म्हैसूरच्या पोलीस अकादमीमध्ये महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते.
हर्षवर्धन यांचे वडील मध्य प्रदेशच्या सिंगरौलीचे एसडीएम आहेत. मुळचे बिहारचे असलेल्या अभिषेक सिंह हे नोकरीमुळे कुटुंबासह मध्य प्रदेशमध्ये राहतात. हर्षवर्धन यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास केली होती. त्यांना १५३ वी रँक मिळाली होती.