पथसंचलनाने रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिन साजरा

By Admin | Published: September 2, 2015 11:32 PM2015-09-02T23:32:00+5:302015-09-02T23:32:00+5:30

सोलापूर : आरपीएफने शानदार पथसंचलन क रीत रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिन साजरा केला़ परेड, साहसी प्रात्यक्षिके सादर करुन आरपीएफ जवानांनी स्वत:ची सक्षमता, सतर्कता दाखवून दिली़

Setting up of Railway Protection Force on day-to-day basis | पथसंचलनाने रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिन साजरा

पथसंचलनाने रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिन साजरा

googlenewsNext
लापूर : आरपीएफने शानदार पथसंचलन क रीत रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिन साजरा केला़ परेड, साहसी प्रात्यक्षिके सादर करुन आरपीएफ जवानांनी स्वत:ची सक्षमता, सतर्कता दाखवून दिली़
बुधवारी सकाळी आरपीएफ रिजर्व्ह लाईन येथील कवायत मैदानावर पथसंचलन सोहळा पार पडला़ २९ ऑगस्ट १९५७ रोजी रेल्वे सुरक्षा बल अधिनियम संसदेत पारित करण्यात आला़ त्या दिवसापासून रेल्वे सुरक्षा बलास वैधानिक दर्जा प्राप्त झाला़ यानिमित्ताने सोलापूर विभागात २९ ऑगस्ट २०१५ ते ४ सप्टेंबर २०१५ या काळात रेल्वे सुरक्षा बलाचा सप्ताह साजरा केला जात आहे़
विभागीय सुरक्षा आयुक्त बी़ एस़ नाथा आणि सहायक सुरक्षा आयुक्त डी़ डी़ चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन थाटात पार पडले़ विभागीय आयुक्त अजयकुमार दुबे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती़ यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त के़ मधुसूदन, वरिष्ठ अभियंता राजू भडके, डांगे, वरिष्ठ विभागीय दूरसंचार व सिग्नल अभियंते नवीन कुमार, विभागीय विद्युत अभियंते विजय सिंह, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक के़ व्ही़ थॉमस, विभागीय सामुग्री प्रबंधक अमित चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकाभियोजक पी़ पी़ रब्बानी यांनी केले़ (प्रतिनिधी)
परेड अन् डॉग शो़़़
परेड आणि डॉग शो या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले़ परेडचे नेतृत्व दौंड येथील रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस़ के़ कोष्टा यांनी के ले़ यावेळी डॉग शोच्या माध्यमातून रेल्वे सुरक्षा बलाची तत्परता दाखवून देण्यात आली़ डॉबरमन, सम्राट, स्नीफर, मोती, नारकोटिक्स आणि राणा असे वेगवेगळे श्वान आणि त्यांची कार्यपद्धतीचे सादरीकरण झाले़
सामाजिक उपक्रमांची भर
स्थापनादिनी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले़ यावेळी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर घेण्यात आले़ अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबीर राबविण्यात आले़ डॉ़ राहुल चौरे, डॉ़ रायभान, डॉ़ भारती, डॉ़ नादरगी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान आणि आरोग्य शिबीर पार पडले़ तसेच श्रमदान, वृक्षारोपण, कार्यशाळा, विभागीय क्रीडा स्पर्धा असे विविध उपक्रम राबविले गेले़
-------------------------------
फोटो - ०२ आरएलवाय
रेल्वे सुरक्षा बलाच्या पथसंचलनप्रसंगी विभागीय व्यवस्थापक अजयकुमार दुबे यांना मानवंदना देताना विभागीय सुरक्षा आयुक्त बी़ एस़ नाथ़

Web Title: Setting up of Railway Protection Force on day-to-day basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.