दहशतमुक्त वातावरणातच तोडगा शक्य
By Admin | Published: March 24, 2015 02:08 AM2015-03-24T02:08:07+5:302015-03-24T02:08:07+5:30
सर्व प्रलंबित वादावर तोडगा निघू शकतो, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाठविलेल्या शुभेच्छापत्रात व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : दहशत व हिंसाचारमुक्त वातावरणात द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातूनच सर्व प्रलंबित वादावर तोडगा निघू शकतो, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाठविलेल्या शुभेच्छापत्रात व्यक्त केला आहे.
त्याबद्दल टिष्ट्वटरवर माहिती देताना मोदी म्हणाले की, मी नवाज शरीफ यांना पत्र पाठवून पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी एका टिष्ट्वटमध्ये त्यांनी प्रलंबित मुद्यांवर दहशत आणि हिंसाचारमुक्त वातावरणातील द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा शक्य असल्याचे स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात जम्मूमध्ये लागोपाठ दोन हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या पत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. कठुआ व सांबा भागात अनेक दिवसांनंतर लागोपाठ दोन हल्ले झाले.
पाकिस्तानने सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवावी. शांततेसाठी ती पूर्वअट ठरते असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी सोमवारी स्पष्ट केले.