टीडीआर घोटाळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

By admin | Published: August 20, 2015 10:10 PM2015-08-20T22:10:03+5:302015-08-20T22:10:03+5:30

टीडीआर घोटाळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

Seven accused in TDR scam case | टीडीआर घोटाळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

टीडीआर घोटाळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

Next
डीआर घोटाळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
बदलापूर नगर परिषदेतील प्रकार- नगराध्यक्षही सामील

बदलापूर : नगर परिषदेतील टीडीआर घोटाळा प्रकरणी गुरुवारी दोन माजी नगराध्यक्षांसह नगररचनाकार आणि सध्या अंबरनाथ नगर परिषदेत कार्यरत असलेले मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी आणि चार अभियंत्यांसह ७ जणांविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची विकास योजना मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २००५ साली तर २००९ साली अंतिमरीत्या मंजूर केली. विकास योजनेच्या विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतूद क्रमांक १५.२.३ आणि १५.४.१ अनुसार जमीनमालकाने सार्वजनिक सुविधा विकास हस्तांतरण (टीडीआर) च्या बदल्यात ती जमीन विकसित करावी, अशी तरतूद आहे. परंतु, या तरतुदीचा वापर कसा करावा किंवा ही तरतूद प्रत्यक्षात कशी वापरावी, याच्या प्रत्यक्षात सूचना दिल्या नाहीत. याचाच गैरफायदा घेत योजनाबद्ध पद्धतीने टीडीआर प्रकरणात भ्रष्टाचार झाला होता. पोलीस तक्रारीत २०१० ते सप्टेंबर २०१३ या कार्यकाळातील नगराध्यक्ष असा उल्लेख केला आहे. मात्र, या काळात नगर परिषदेत चार नगराध्यक्षांनी काम पाहिले असले तरी तक्रारीत दोन माजी नगराध्यक्षांचा उल्लेख करण्यात आला. याप्रकरणी बदलापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांच्यासह बदलापूर नगर परिषदेचे तत्कालीन सहायक नगररचनाकार सुनील दुसाणे, तत्कालीन नगर अभियंते, तुकाराम मांडेकर, अशोक पेडणेकर, निलेश देशमुख आणि किरण गवळे या सात जणांविरुद्ध ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
...
'टीडीआर देणे ही पूर्णपणे प्रशासकीय बाब असून त्यात लोकप्रतिनिधींची कोणतीही भूमिका नसल्याने व सर्व प्रकरणांमध्ये निविदा मागवून कामे करण्यात आल्याने नगराध्यक्षांवर दाखल झालेल्या गुन्‘ांबाबत कोर्टात दाद मागणार आहे. वामन म्हात्रे कुळगाव-बदलापूर नगर परिषद, नगराध्यक्ष

Web Title: Seven accused in TDR scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.