लष्करातील सात जणांना जन्मठेप

By admin | Published: November 14, 2014 02:23 AM2014-11-14T02:23:19+5:302014-11-14T02:23:19+5:30

बनावट चकमकप्रकरणी भारतीय लष्कराने दोन अधिका:यांसह आपल्या सात कर्मचा:याना दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

Seven of the Army's life imprisonment | लष्करातील सात जणांना जन्मठेप

लष्करातील सात जणांना जन्मठेप

Next
श्रीनगर : चार वर्षापूर्वी ज्यावरून संपूर्ण काश्मीरमध्ये प्रचंड असंतोष उसळला होता त्या 2क्1क् च्या मछिल बनावट चकमकप्रकरणी भारतीय लष्कराने दोन अधिका:यांसह आपल्या सात कर्मचा:याना दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या चकमकीत तीन काश्मिरी युवकांना पाकिस्तानी घुसखोर असल्याचे भासवून हकनाक ठार मारले गेले     होते.
अलीकडेच अशाच प्रकारे मोटारीतून जाणा:या दोन काश्मिरी युवकांना आपल्या जवानांनी, पाकिस्तानी दहशतवादी समजून, चुकीने ठार मारल्याची जाहीर कबुली लष्कराने दिली होती. यावरून ‘स्पेशल पॉवर्स अॅक्ट’मुळे अनिर्बंध अधिकार असलेल्या लष्कराची विवेकबुद्धी शाबूत असल्याचे स्पष्ट झाले होते. पण रीतसर कोर्ट मार्शलची कारवाई होऊन त्यात लष्कराने घडविलेली चकमक बनावट ठरून लष्करी कर्मचा:यांना कठोर शिक्षा होण्याची काश्मीरच्या संदर्भातील ही पहिलीच वेळ आहे. यामुळे काश्मिरी जनतेच्या मनात एकूणच लष्कराबद्दल खदखदत असलेला असंतोष कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
कोर्ट मार्शलमध्ये जन्मठेप ठोठावण्यात आलेल्यांमध्ये 4 राजपूत रेजिमेंटचे त्यावेळचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. के. पठानिया, कॅप्टन उपेंद्र सिंग व सुभेदार सतबीर सिंग या तीन अधिका:यांसह हवालदार बिरसिंग, शिपाई चंद्रभान, शिपाई नागेंद्र सिंग व शिपाई नरिंदर सिंग या लष्करी जवानांचा समावेश आहे. प्रादेशिक सेनेचे अब्बास हुसैन शाह यांना निदरेष मुक्त केले गेले.
या सर्वाचे सेवालाभ रोखून ठेवण्याचा आदेशही कोर्ट मार्शलने दिला आहे. आपल्या कर्मचा:यांविरुद्धचा फौजदारी खटला लष्कर स्वत: चालविते त्यास ‘कोर्ट मार्शल’ असे म्हटले जाते. या प्रकरणाची कोर्ट मार्शलची न्यायालयीन कारवाई कुपवाडास्थित 68 माऊन्टन ब्रिगेडचे प्रमुख ब्रिगेडियर दीपक मेहरा यांच्या नेतृत्वाखाली झाली.
अनन्यसाधारण घटना
ही अनन्यसाधारण घटना आहे. अशा घटनांमध्येही न्याय मिळू शकतो यावर काश्मीरमधील कोणाचाही विश्वास नव्हता. मछिलसारखी बनावट चकमकीची घटना पुन्हा पाहावी लागणार नाही आणि ज्यांच्या कोणाच्या मनात तसे करण्याचे असेल त्यांनाही हा इशारा ठरेल, अशी आशा आहे, असे ट¦ीट जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)
 
429 एप्रिल 2क्1क् रोजी झालेल्या या बनावट चकमकीत उत्तर काश्मीरमधील नडिहाल गावातील शेहजाद अहमद, रियाझ अहमद व मोहम्मद शफी या तीन युवकांना लष्करी जवानांनी गोळ्य़ा घालून ठार केले होते.
 
4खटल्यातील साक्षी-पुराव्यांवरून असे सिद्ध झाले की, या तीन युवकांना नोकरी व पैशाचे आमिष दाखवून लष्करानेच कुपवाडा जिल्ह्यातील कलारूस गावात नेले होते व तेथे त्यांना ठार मारण्यात आले. 
 
4भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांत असलेले तीन पाकिस्तानी अतिरेकी चकमकीत ठार झाल्याचे कुभांड लष्कराकडून दुस:या दिवशी रचले गेले होते.

 

Web Title: Seven of the Army's life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.