नदी पुनरुज्जीवनाला अनास्थेची बाधा सात कोटी निधी प्राप्त : जून अखेरची मुदत मात्र एकाही कामाला सुरुवात नाही

By admin | Published: May 21, 2016 12:07 AM2016-05-21T00:07:21+5:302016-05-21T00:07:21+5:30

जळगाव : राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी ७ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत ८६ पैकी एकाही बंधार्‍याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

Seven crore fund sanctioned for revival of river revival: June's deadline does not start any work | नदी पुनरुज्जीवनाला अनास्थेची बाधा सात कोटी निधी प्राप्त : जून अखेरची मुदत मात्र एकाही कामाला सुरुवात नाही

नदी पुनरुज्जीवनाला अनास्थेची बाधा सात कोटी निधी प्राप्त : जून अखेरची मुदत मात्र एकाही कामाला सुरुवात नाही

Next
गाव : राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी ७ कोटी १३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत ८६ पैकी एकाही बंधार्‍याच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

१० नद्यांवर ८६ बंधार्‍यांचे कामे
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी पुनरुज्जीवन योजनेची कामे सुरू आहेत. यात मालन, भोगावती, खडकी, कांग, तितूर, हिवरा, बहुळा, गिरणा, व्याघ्रा, देव या नद्यांवर ८६ बंधारे बांधण्यात येणार आहे. यासाठी १८ कोटी ३७ लाखांचा निधी अपेक्षित आहे. त्यापैकी मार्च महिन्यात सात कोटी १३ लाखांचा निधी या कामांसाठी प्राप्त झाला आहे.

दोन नद्यांच्या कामाला सुरुवात
नदी पुनरुज्जीवन योजनेंतर्गत लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जि.प.लघुसिंचन विभाग, मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन या यंत्रणांकडे कामे सोपविण्यात आली आहे. त्या पैकी बोदवड व भुसावळ तालुक्यातून जाणार्‍या भोगावती नदीवरील तीन बंधार्‍यांवरील फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. तर चार बंधार्‍यांच्या फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर बोदवड तालुक्यातील देव नदीच्या ७ बंधार्‍यांच्या फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली असून सात बंधार्‍यांचे फाउंडेशन पूर्ण झाले आहे.

अनेक बंधार्‍यांचे काम निविदास्तरावर
अमळनेर तालुक्यातील मालन नदी, जामनेर तालुक्यातील कांग व खडकी नदी, पाचोरा तालुक्यातील तितूर, हिवरा, बहुळा, चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी, बोदवड तालुक्यातील व्याघ्रा नदीवरील बहुतांश बंधार्‍यांच्या काम हे निविदास्तरावर तर काही कामे हे कार्यारंभ आदेशासाठी प्रलंबित आहे. कांग नदीवरील १० बंधार्‍यांचे दोन कोटी १३ लाखांचा प्रस्ताव सुधारित मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तर गिरणा नदीवरील नाला खोलीकरण विषयक असल्याने चाळीसगावात तितूर नदी ११ बंधार्‍यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

चांगला पाऊस झाल्यास काम अशक्य
सध्या नदी पात्रात पाणी नसल्याने बंधार्‍यांचे काम सहज पूर्ण होण्यासारखी स्थिती आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामानखात्याने वर्तविला आहे. त्यामुळे जून महिन्यातच चांगला पाऊस होऊन नदी व नाले भरल्यास बंधारे उभारणीच्या कामाला खीळ बसणार आहे. त्यामुळे बंधार्‍यांच्या कामाला वेग देण्याची गरज आहे.

Web Title: Seven crore fund sanctioned for revival of river revival: June's deadline does not start any work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.