जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 12:40 AM2016-02-24T00:40:59+5:302016-02-24T00:40:59+5:30

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

The seven dams in the district are Kordadek | जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

Next
ल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक
जिल्ह्यातील तीन मोठे मध्यम प्रकल्प वगळता १३ छोटे धरणे आहेत. त्यात मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, अंजनी या सहा धरणांमधील उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. तर बहुळा धरणात ०.३०२ इतका उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील १३ धरणांपैकी तब्बल सात धरणांमधील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने या धरणांवर अवलंबून असलेले शहर आणि गावांतील पिण्याच्या पाण्याची स्थिती पुढच्या चार महिन्यात आणखी बिकट होत जाणार आहे.

सुकी, अभोरा व तोंडापूरही जेमतेम
रावेर तालुक्यातील सुकी धरणात ४०.०९५ पाणीसाठा आहे. त्यात २९.७८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात आजच्यास्थितीला ७४.७४ टक्के पाणीसाठा आहे. तर अभोरा धरणात ५.५९२५ दलघमी पाणीसाठा आहे. त्यात ४.१७२५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात सद्यस्थितीला ६९.३१ टक्के पाणीसाठा आहे. मंगरुळ धरणात ७.९२८ इतका जलसाठा आहे. त्यात ५.५३२ उपयुक्त जलसाठा आहे. तर मोर धरणात ७.६५९ जलसाठा असून ६.११४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. गूळ प्रकल्पात देखील ४५.६१ टक्के जलसाठा आहे.

मार्चपासून बाष्पीभवनाचा वेग अधिक राहणार
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान हे ४५ डिग्रीसेल्सीअसच्या पार जात असते. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व छोट्या प्रकल्पांची ही स्थिती आहे. त्यात मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होणार असल्याने या प्रकल्पांमधील बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने जलसाठ्यात मोठी घट होण्याचे संकेत आहेत. यासह आवर्तन सोडल्यानंतर जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट होतच राहणार आहे.
१५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी
पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने १५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. तीन गावांमध्ये कुपनलिका केल्या असून २३ गावांमध्ये आठ तात्पुरत्या पाणी योजना तर ८३ गावांमध्ये विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने एक कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च केला आहे. सध्या जळगाव, जामनेर, अमळनेर व पारोळा तालुक्यातील २० गावांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Web Title: The seven dams in the district are Kordadek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.